शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:23 IST2026-05-19T10:21:11+5:302026-05-19T10:23:38+5:30

Shivraj Motegaonkar Latest News: पुण्यात चौकशीसाठी हजर राहिलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकरची अटक झाल्याची बातमी शहरात आल्यानंतर कोचिंग क्लासेस परिसरात खळबळ उडाली.

After the arrest of Shivraj Motegaonkar, the CBI's stay in Maharashtra has been extended, the investigation session continues! | शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!

शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!

लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सीबीआयचे पथक तिसऱ्यांदा सोमवारी लातूर शहरात दाखल झाले. आरसीसी क्लासेसची दिवसभर झाडाझडती घेतल्यानंतरही पथकाचा लातुरातच मुक्काम राहणार असून, तो किमान पुढचे चार-पाच दिवस असल्याचे कळते.

पुण्यात चौकशीसाठी हजर राहिलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकरची अटक झाल्याची बातमी शहरात आल्यानंतर कोचिंग क्लासेस परिसरात खळबळ उडाली. त्या अटकेनंतर पेपर आणखी कोणाला मिळाला अथवा पेपरफुटीचे इतर धागेदोरे आहेत का? याचा शोध सीबीआयचे पथक घेत असल्याचे समजते. कागदपत्रे, डिजिटल पुरावे तसेच सराव प्रश्नपत्रिका अशा सर्व संदर्भाने सीबीआय शोधमोहीम राबवत आहे.

पोलिस तपास अन् सीबीआयची दिशा...

सीबीआयने देशभरामध्ये विविध ठिकाणी आरोपींना ताब्यात घेतले. पेपर फोडणारे, पेपर सेटर, नाशिक कनेक्शनचा धागा समोर आल्यानंतर पहिल्या टप्प्यात त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पैसे देऊन पेपर मिळवणाऱ्या दुसऱ्या कडीतील आरोपींची शोधमोहीम घेतली. 

लातुरातील तक्रारीच्या संदर्भाने पोलिसांनी तपास करून पुढील कारवाईसाठी सीबीआयशी समन्वय केला. स्थानिक जबाबामधून मिळालेली माहिती आणि पेपर फोडणारे, पेपर सेटर अशी वरून लागणारी लिंक जोडल्याने तपास गतीने पुढे गेला. आता आणखी कोणाचा व कसा संबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे.

व्हिडीओ आणि पीडीएफ प्रश्नसंच...

आरसीसी स्टडी मटेरियलमधील प्रश्न परीक्षेत कसे आले, याचा विद्यार्थ्यांसमवेत केलेला मोटेगावकरचा व्हिडीओ आणि हस्तलिखित पीडीएफचा प्रश्नसंच हा मुद्दा अटकेनंतर दिवसभर चर्चेत होता. त्यांनी घेतलेल्या मॉक टेस्टमधील प्रश्न आणि ३ मे रोजीच्या परीक्षेतील ४२ प्रश्न जुळले. 

त्यासंदर्भात स्थानिक पोलिसांना आणि सीबीआयच्या दिल्ली कार्यालयाला तक्रार झाली होती. आता त्यास मिळालेले प्रश्न पुढे कोणापर्यंत पोहोचले, याचा मात्र उलगडा झाला नसल्याने तपास त्या दिशेने जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title : NEET घोटाला: मोटेगांवकर की गिरफ्तारी के बाद सीबीआई का महाराष्ट्र में डेरा

Web Summary : NEET पेपर लीक मामले में मोटेगांवकर की गिरफ्तारी के बाद, सीबीआई ने लातूर में अपनी जांच तेज कर दी है, और अपना प्रवास बढ़ा दिया है। आगे के संबंधों की पहचान करने और पेपर लीक की उत्पत्ति का पता लगाने पर ध्यान केंद्रित किया जा रहा है, दस्तावेजों और डिजिटल सबूतों की जांच की जा रही है।

Web Title : NEET Scam: CBI Stays in Maharashtra After Motegaonkar's Arrest

Web Summary : Following Motegaonkar's arrest in the NEET paper leak, CBI intensified its investigation in Latur, extending its stay. Focus is on identifying further connections and tracing the paper leak's origins, examining documents and digital evidence.