Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 19:36 IST2026-05-19T19:34:33+5:302026-05-19T19:36:14+5:30
Twisha Sharma : मॉडेल ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तिचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. ट्विशाच्या सासू गिरीबाला सिंह यांनीही अनेक आरोप केले आहेत.

Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
मॉडेल ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तिचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत सासरच्या लोकांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. ट्विशाच्या सासू निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांनीही अनेक आरोप केले आहेत. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असून यावरून भोपाळपासून नोएडापर्यंत दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू आहे. ट्विशाचा पती समर्थ सिंह याचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला. आता समर्थची आई गिरीबाला सिंह समोर आल्या असून त्यांनी आपला मुलगा फरार असल्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
समर्थ कधी समोर येणार? या प्रश्नावर एएनआय (ANI) शी बोलताना गिरीबाला सिंह म्हणाल्या, "समर्थ नक्कीच हजर होईल. मात्र, त्याला स्वतःच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचाही पूर्ण अधिकार आहे. हे असं प्रकरण आहे जे फेटाळलं गेलं पाहिजे आणि ज्यामध्ये खरं तर आम्हाला लोकांची सहानुभूती मिळायला हवी. साहजिकच, तो आपल्या अधिकारांचा पूर्ण वापर करेल आणि त्याचा वकील नक्कीच त्याच्या बाजूने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करेल."
#WATCH | Bhopal, MP | Twisha Sharma death case | Mother-in-law of the victim and retired judge Giribala Singh says, "Within 5 months, I realised that she held quite liberal views... on the 17th, the moment she received confirmation of her pregnancy, her entire demeanour changed;… pic.twitter.com/LYZ5SW2R3S
— ANI (@ANI) May 19, 2026
MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
गिरीबाला सिंह पुढे म्हणाल्या, "समर्थबद्दल बोलायचं झालं तर, मुलं अनेकदा आपल्या भावना अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त करू शकत नाहीत. माझा मुलगा त्रस्त आहे, कारण सुरुवातीपासूनच तिचा स्वभाव तसा होता. त्याने प्रयत्न केले, पण सुधारण्याचं कोणतंही लक्षण नव्हतं. दोघांमध्ये भांडण असं काही मोठं झालं नव्हतं. परंतु गर्भपातानंतर मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होतेच. 'तू मला कंट्रोल करू शकत नाहीस' अशी तिची जिद्द आणि हट्टीपणा होता... जर एखाद्याच्या मनात दोन वेगळे विचार घोळत असतील, तर तुम्ही काय निष्कर्ष काढणार?"
"हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
ट्विशा शर्माची सासू गिरीबाला सिंह यांनी पुन्हा एकदा ट्विशावर गर्भपात केल्याचे आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, "५ महिन्यांच्या आतच मला जाणवलं होतं की तिचे विचार खूप मॉडर्न होते. १७ तारखेला ज्या क्षणी तिच्या प्रेग्नन्सीबाबत समजलं त्याच क्षणी तिचं संपूर्ण वागणं बदललं. तिने जाहीर केलं की तिला हे मूल नको आहे. त्याच संध्याकाळी जेव्हा मी ऑफिसमधून घरी परतले, तेव्हा मी पाहिले की तिची अवस्था खूप वाईट होती. ती स्वतःला मारून घेत होती. ती सतत ओरडत होती आणि म्हणत होती, 'मी अशी आणखी जगू शकत नाही!' मी तिला म्हणाले, 'जर तुला खरोखरच जायचं असेल, तर आम्ही उद्याचं तुझं तिकीट बुक करू शकतो, जेणेकरून तू नीट जाऊ शकशील.'"