बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 00:21 IST2026-05-20T00:18:50+5:302026-05-20T00:21:18+5:30

indian high commission official found dead bangladesh: मृत व्यक्ती भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा प्रोटोकॉल अधिकारी म्हणून कार्यरत

indian high commission official found dead chattogram bangladesh police investigation underway | बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

indian high commission official found dead bangladesh: बांगलादेशातीलभारतीय उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला. पोलिसांनी मंगळवारी चटगांवच्या खुलशी भागातील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या कार्यालयातून एका भारतीय नागरिकाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्या व्यक्तीचे नाव नरेंद्र आहे. हरियाणाचा रहिवासी असलेला नरेंद्र, चटगांव येथील भारतीय उच्चायुक्तालयात सुरक्षा प्रोटोकॉल अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताची ओळख ३५ वर्षीय नरेंद्र अशी पटली आहे. त्याच्या वडिलांचे नाव राम निवास असून ते हरियाणाचे रहिवासी होते. मंगळवारी सकाळी ३५ वर्षीय नरेंद्र त्याच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हता. तिथे उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनी सुरुवातीला स्वतःहून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याने दरवाजा न उघडल्याने पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि उच्चायुक्तालयातील एका खोलीतून नरेंद्रचा मृतदेह ताब्यात घेतला.

चटगांव महानगर पोलीस (सीएमपी) आयुक्त हसन मोहम्मद शौकत अली यांनी बांगलादेशी वृत्तपत्र 'द डेली स्टार'ला सांगितले की, नरेंद्र त्या कार्यालयात सुरक्षा प्रोटोकॉल अधिकारी म्हणून कार्यरत होते. सीएमपी आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, दूतावासाच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीला नरेंद्रच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. बांग्लादेशच्या एका वृत्त संकेतस्थळाने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, जुन्या व्हिसा केंद्र इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील डेटा एंट्री रूमच्या बाथरूमच्या दारासमोर हा मृतदेह आढळला. चटगांव महानगर पोलीस जनसंपर्क सहायक आयुक्त अमिनूर रशीद म्हणाले की, आम्हाला प्राथमिक संशय आहे की रात्रीच्या वेळी बाथरूम वापरत असताना त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असावा. तथापि, मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.

तपास अहवाल तयार झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चटगांव मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला. त्यांनी सांगितले की तपासात अद्याप मृत्यूचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. मृत्यूचे नेमके कारण केवळ शवविच्छेदनानंतरच कळेल. सीएमपीचे उपायुक्त (उत्तर विभाग) अमीरुल इस्लाम यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला जाईल आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला जाईल.

Web Title: indian high commission official found dead chattogram bangladesh police investigation underway