वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)

वैभव सूर्यवंशीचा धमाकेदार शो

By सुशांत जाधव | Updated: May 19, 2026 22:46 IST2026-05-19T22:45:44+5:302026-05-19T22:46:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Vaibhav Suryavanshi Breaks Travis Head And Adam Gilchrist Record Most Powerplay Runs In An IPL Season | वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)

जयपूरच्या मैदानातील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या २०० पार धावसंख्येच्या लढाईत वैभव सूर्यवंशी याने धमाकेदार खेळीचा आणखी एक नजराणा पेश केला. या सामन्यात संथ गतीने डावाची सुरुवात करणाऱ्या वैभवनं गियर बदलून तुफान फटकेबाजी करत २४ चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्यानंतर त्याने नव्या अंदाजात अर्धशतकाचा आनंद व्यक्त केला. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा खास विक्रम आपल्या नावे करताना त्याने ट्रॅविस हेड, साई सुदर्शन आणि गिलख्रिस्ट यांना मागे टाकले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पॉवर प्लेमध्ये धावांची 'बरसात'; ट्रॅविस हेडचा विक्रम मोडला आता वॉर्नरचा विक्रम धोक्यात

आयपीएलच्या एका हंगामात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी दुसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या हंगामात त्याने पॉवर प्लेमध्ये ४२६ धावा केल्या आहेत. त्याच्यापुढे फक्त डेविड वॉर्नर आहे ज्याने २०१६ च्या हंगामात ४६७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. ट्रॅविस हेडनं २०२४ च्या हंगामात पॉवर प्लेमध्ये ४०२ धावा केल्या होत्या. साई सुदर्शन याने २०२५ च्या हंगामात ४०२ तर गिलख्रिस्टनं २००९ च्या हंगामात ३८२ धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी डेविड वॉर्नरला मागे टाकून अव्वलस्थानीही पोहचू शकतो.

पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय

शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं

वैभव सूर्यवंशी लखनौ विरुद्धच्या सामन्यात यंदाच्या हंगामातील दुसरे आणि IPL कारकिर्दीतील तिसरे शतक झळकवण्याच्या जवळ पोहचला होता. १४ व्या षटकात मोहसीन खान याने त्याला रनआउ करण्याची संधी गमावली. पण याच षटकातील अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात वैभव सूर्यवंशी झेलबाद झाला. त्याने ३८ चेंडूत ९३ धावांची धमाकेदार खेळी केली. शतक अवघ्या ७ धावांनी हुकले.

Web Title : वैभव सूर्यवंशी का नया रिकॉर्ड: हेड और गिलक्रिस्ट को पछाड़ा! (वीडियो)

Web Summary : लखनऊ सुपर जायंट्स के खिलाफ वैभव सूर्यवंशी की विस्फोटक पारी में 24 गेंदों में अर्धशतक शामिल था। उन्होंने इस सीजन में पावरप्ले में सबसे ज्यादा रन बनाने का नया रिकॉर्ड बनाया, जिसमें ट्रेविस हेड, साई सुदर्शन और गिलक्रिस्ट से आगे निकल गए।

Web Title : Vaibhav Suryavanshi's New Record: Surpasses Head and Gilchrist! (VIDEO)

Web Summary : Vaibhav Suryavanshi's explosive innings against Lucknow Super Giants included a rapid half-century off 24 balls. He set a new record for most runs in the powerplay this season, surpassing Travis Head, Sai Sudarshan, and Gilchrist.