पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय

Team India Squad Announced for IND vs AFG ODI: १४ जूनपासून अफगाणिस्तान विरूद्ध रंगणार क्रिकेट मालिका

सध्या IPL 2026चा हंगाम सुरू आहे. त्यानंतर भारतीय संघ १४ जूनपासून अफगाणिस्तान विरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

या मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र संघ निवडताना BCCIने घेतलेल्या काही आश्चर्यकारक निर्णयांची चर्चा रंगली आहे.

अष्टपैलू रवींद्र जाडेजाचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच ऋषभ पंतलाही एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे.

ईशान किशन तब्बल तीन वर्षांनंतर वनडे संघात परतला आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामनादेखील अफगाणिस्तानविरुद्धच खेळला होता.

प्रिन्स यादवने टी२० फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने केवळ १४ लिस्ट ए सामने खेळले, पण त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे.

गुरनूर ब्रार केवळ ९ लिस्ट ए सामने खेळला आहे, तरीही त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. हा खेळाडू केवळ एकच आयपीएल सामना खेळला आहे.

संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची सरासरी ५६ पेक्षा जास्त आहे, पण त्याचा मात्र संघात समावेश करण्यात आला नाही.