मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)

Mohammad Shami Rishabh Pant Team India IPL 2026 LSG vs RR: टीम इंडियातून वगळण्यात आल्यानंतर शमीला लखनौच्या टीममधूनही बाहेरचा रस्ता दाखवला गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 00:01 IST2026-05-19T23:59:58+5:302026-05-20T00:01:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rishabh Pant deliberately ignored question when asked about Mohammed Shami What exactly happened during the toss watch ipl 2026 team india squad announced | मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)

मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)

Mohammad Shami Rishabh Pant Team India IPL 2026 LSG vs RR: आयपीएल २०२६ च्या ६४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) २२१ धावांचे विशाल आव्हान पार करत ७ गडी राखून एक अविश्वसनीय विजय नोंदवला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक ठरला, परंतु राजस्थानने ५ चेंडू राखून विजय आपल्या नावे केला. या सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेकीतील एक किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.

मोहम्मद शमीबद्दलचा प्रश्न अन् ऋषभ पंतचे 'वेगळेच' उत्तर

आगामी अफगाणिस्तान दौऱ्यासाठी आज भारताचा संघ जाहीर झाला. त्यातून मोहम्मद शमीला वगळण्यात आले. त्यानंतर लखनौच्या सामन्याच्या वेळी कर्णधार ऋषभ पंतने स्पष्ट केले की, शमी संघातून बाहेर आहे. तो संघाबाहेर कोणत्या कारणास्तव आहे? असा सवाल अँकरने केला. पण ऋषभ पंतला प्रश्नच नीट कळला नाही. त्यामुळे त्याने वेगळेच उत्तर दिले. अखेर शमीबाबतचा प्रश्न अँकरने सोडून दिला आणि पुढच्या गप्पांना सुरुवात केली. या प्रकार घडल्यावर काही चाहत्यांनी सोशल मीडियावर असे म्हटले आहे की, पंतने मुद्दाम ऐकून न ऐकल्यासारखे करत उडवाउडवीची उत्तरे दिली. तर काहींच्या मते, स्टेडियममधील प्रेक्षकांच्या आवाजात पंतला खरंच प्रश्न ऐकू आला नसावा. व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा- 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सने निर्धारित २० षटकांत ५ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला होता. लखनौकडून मिचेल मार्शने ५७ चेंडूंत ९६ धावांची तुफानी खेळी केली, मात्र त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. त्याला जोश इंग्लिसने २९ चेंडूंत ६० धावा करून आणि रिषभ पंतने २३ चेंडूंत ३५ धावा करून उत्तम साथ दिली. राजस्थानकडून यश पुंजा याने २ गडी बाद केले, तर जोफ्रा आर्चरला १ बळी मिळाला.

२२१ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात दणकेबाज झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने २३ चेंडूंत ४३ धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ३८ चेंडूंत ९३ धावांची मॅचविनिंग खेळी खेळली. वैभवने आपल्या या खेळीत १० उत्तुंग षटकार ठोकले. त्याला ध्रुव जुरेलची भक्कम साथ लाभली, ज्याने ३८ चेंडूंत नाबाद ५३ धावा केल्या आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. राजस्थानने १९.१ षटकांत ३ बाद २२५ धावा करत विजय मिळवला. लखनौकडून मोहसीन खान आणि आकाश सिंग यांना प्रत्येकी १ बळी मिळाला.

Web Title : शमी के सवाल पर पंत ने दिया टालमटोल जवाब; टॉस में क्या हुआ?

Web Summary : RR बनाम LSG के दौरान, पंत ने शमी को अफगानिस्तान दौरे से बाहर करने के सवाल को टाल दिया। राजस्थान रॉयल्स ने 221 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 7 विकेट से जीत हासिल की। सूर्यवंशी के 93 रन निर्णायक रहे।

Web Title : Pant evades Shami question during toss; what really happened?

Web Summary : During RR vs LSG, Pant seemingly dodged a question about Shami's exclusion from the Afghanistan tour squad. Rajasthan Royals chased down a 221-run target, winning by 7 wickets. Suryavanshi's 93 led the chase.