आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 07:37 IST2026-05-20T07:32:22+5:302026-05-20T07:37:48+5:30
Today's Horoscope, 20 May 2026 : आज कोणत्या राशीच्या लोकांचे भाग्य खुलणार? कोणत्या राशीच्या लोकांना राहावं लागणारं जपून? वाचा आजचे राशीभविष्य...

आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
मेष :- आज आपले मन चंचन झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल व त्यामुळे महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. आज स्त्रीयांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
आणखी वाचा
वृषभ :-आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. कलावंत, कारागीर, व लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.
आणखी वाचा
मिथुन :- आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आर्थिक फायदा होईल. मनात येणार्या नकारात्मक विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करा. दांपत्य जीवन सुखावह होईल.
आणखी वाचा
कर्क :- आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल.
आणखी वाचा
सिंह :- आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील. पत्नीचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस नवीन वस्तू खरेदीला अनुकूल आहे.
आणखी वाचा
कन्या :- आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल.
आणखी वाचा
तूळ :- आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात.
आणखी वाचा
वृश्चिक :- आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही अवैध काम किंवा सरकारी काम ह्या पासून दूर राहा, नाहीतर अडचणीत याल.
आणखी वाचा
धनु :- आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार - विनिमयासाठी अनुकूल आहे. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. भिन्नलिंगी व्यक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाऊ शकेल. भागीदारी लाभदायी होईल.
आणखी वाचा
मकर :- आज व्यापार - व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. आर्थिक देवाण - घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. धनलाभ संभवतो. कामात यशस्वी व्हाल.
आणखी वाचा
कुंभ :- विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. शक्यतो आज प्रवास टाळावेत. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता असल्याने त्याची तरतूद करून ठेवावी.
आणखी वाचा
मीन :- आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते. स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.
आणखी वाचा
