नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:54 IST2026-05-20T06:54:48+5:302026-05-20T06:54:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नालेसफाईच्या ठेक्याचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडे १५ टक्के लाचेची मागणी करणाऱ्या एपीएमसीच्या उपसचिवासह ...

Demand for 15 percent bribe in drain cleaning contract; APMC Deputy Secretary caught in ACB's trap | नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात

नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नालेसफाईच्या ठेक्याचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडे १५ टक्के लाचेची मागणी करणाऱ्या एपीएमसीच्या उपसचिवासह एका खासगी व्यक्तीला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

डॉ. दीपक आवटे हे घनकचरा विभागाचा प्रभारी कार्यभार सांभाळत आहेत. एपीएमसी आवारातील नालेसफाईच्या कामाचा ठेका मंजूर झाल्यानंतर त्यांनी जनरेटर ऑपरेटर समीर म्हात्रे याच्या माध्यमातून संबंधित ठेकेदाराकडे बिलाच्या रकमेतून १५ टक्के लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.  बिलासाठी तगादा लावल्याने ठेकेदाराने तक्रार केली.

नवी मुंबईत तिसरी कारवाई
मागील काही दिवसांत नवी मुंबई एसीबीने केलेली ही तिसरी मोठी कारवाई असून शासकीय कार्यालयांतील वाढत्या लाचखोरीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सापळा रचून केली कारवाई
बिल मंजुरीपूर्वीच सातत्याने तगादा लावला जात असल्याने ठेकेदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने कांदा-बटाटा मार्केटमधील एपीएमसी प्रशासकीय इमारतीत सापळा रचला. यावेळी ठरल्याप्रमाणे १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. आवटे आणि समीर म्हात्रे यांना ताब्यात घेतले. उशिरापर्यंत एपीएमसी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

सातबाऱ्यासाठी लाच;
मंडळ अधिकारी अटकेत

पनवेल : सातबारा उताऱ्यावर नाव चढवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 
३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना  रंगेहाथ पकडले. 
गोवर्धन माने असे अटक अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराकडून त्याने सुरुवातीला १ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर  ५० हजार देण्याचे ठरले. मात्र, अखेर ३० हजारांवर तडजोड झाली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने सापळा रचून गोवर्धन माने याला ताब्यात घेतले.
 

Web Title : नाली सफाई ठेके के लिए रिश्वत लेते एपीएमसी अधिकारी गिरफ्तार।

Web Summary : नाली सफाई ठेके के बिल को मंजूरी देने के लिए 15% रिश्वत मांगने पर एपीएमसी के उप सचिव और एक ऑपरेटर को गिरफ्तार किया गया। पनवेल में एक राजस्व अधिकारी को भूमि रिकॉर्ड अपडेट के लिए रिश्वत लेते पकड़ा गया।

Web Title : APMC official caught accepting bribe for clearing drainage contract bill.

Web Summary : An APMC deputy secretary and an operator were arrested for demanding a 15% bribe to clear a drainage contract bill. Separately, a revenue officer in Panvel was caught taking a bribe for land record updates.