चंद्र आज 15 जुलै, 2025 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशम भावात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कामाच्या योजना यशस्वीपणे आखू शकाल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. अपूर्ण कामे तडीस जातील. बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरात वर्चस्व राहील व आपलेपणा वाढेल. भेटवस्तू व मान - सन्मान प्राप्त झाल्याने मन प्रसन्न होईल.