Lokmat Astrology

दिनांक : 13-Nov-25
Daily Top 2Weekly Top 5

राशी भविष्य

 वृषभ

वृषभ

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांच्या जीवनात प्रेमिकेच्या सहयोगामुळे नावीन्य येईल. ते आपल्या प्रणयी जीवनाचा सुखद अनुभव घेतील. विवाहितांच्या जोडीदाराच्या स्वभावात बदल झाल्यामुळे काही समस्या निर्माण होतील. दोघांत क्रोध, चिडचिडेपणा येण्याची संभावना असून त्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता येऊ शकते. ह्या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. असे असले तरी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वकच करावी. कोणालाही पैसे उसने देऊ नये. आपल्या व्यवसायात मेहनतीचा पूर्ण लाभ आपणास मिळेल. आपला एखादा नवीन प्रकल्प पूर्ण होण्याची संभावना सुद्धा आहे. आपले सहकारी आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यात आपल्याला मदत करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडे सावध राहावे लागेल. कार्यक्षेत्री कोणत्याही प्रकारच्या राजकारणात सहभागी होऊ नये. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. ते एखाद्या स्पर्धेसाठी सुद्धा मेहनत करतील. त्यात ते यशस्वी होण्याची दाट संभावना आहे. ह्या आठवड्यात आपणास एखादे टेन्शन असण्याची शक्यता आहे. आपणास डोकेदुखी, माईग्रेन इत्यादी जी समस्या होती ती आता दूर होईल. परंतु आपण जर आपल्या आहारावर लक्ष दिले नाही तर इतर काही समस्या होण्याची संभावना आहे.

राशी भविष्य

13-11-2025 गुरुवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : माघ

अमृत काळ : 09:31 to 10:55

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:42 to 11:30 & 15:30 to 16:18

राहूकाळ : 13:44 to 15:09