हा आठवडा आपणास खुश करणारा आहे. जर वैवाहिक जीवनात काही तणाव असला तर तो दूर करण्याचा प्रयत्न ह्या आठवड्यात आपण कराल. तसेच जर आपणास एकमेकांची एखादी गोष्ट आवडली नसली तर एकत्र बसून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा कराल. त्यामुळे नात्यातील प्रेम पुन्हा स्थापित होईल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेच्या मनमानी वागणुकीमुळे काहीसे त्रस्त होतील. दोघांनी सामंजस्य दाखविल्यास आपले नाते दृढ करू शकतील. ह्या आठवड्यात आपण घरगुती सामान खरेदीवर भरपूर पैसा खर्च कराल. त्यामुळे नंतर आपणास पैश्यांची कमतरता भासू शकते. दीर्घ काळासाठी एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करणे हितावह ठरेल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या योजनांवर लक्ष ठेवावे लागेल, अन्यथा इतर लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मना प्रमाणे काम मिळेल. त्यांची पदोन्नती सुद्धा संभवते. त्यांनी ह्या आधी एखादी नोकरी सोडली असेल तर तेथून त्यांना परत बोलावण्यात येण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रता टिकवून ठेवावी लागेल. एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास तो मिळण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. ह्या आठवड्यात बाहेरच्या कामातील व्यस्ततेमुळे आपले प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची संभावना आहे. तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी.