Lokmat Astrology

दिनांक : 16-Jul-25

राशी भविष्य

 कर्क

कर्क

ह्या आठवड्यात प्रेमीजनांना त्यांच्या प्रेमिकेचा सहवास लाभल्याने नात्यात ऊर्जा निर्माण होऊन नाते दृढ होण्यास मदत होईल. विवाहितांच्या जीवनात काही तणाव असल्याने नात्यातील समस्या वाढून कटुता निर्माण होऊ शकते. तेव्हा त्यांनी नाते सांभाळण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल. आपले हरवलेले किंवा खोळंबलेले पैसे आपणास ह्या आठवड्यात मिळतील. आपणास जर एखादी आर्थिक चिंता सतावत असली तर ती ह्या आठवड्यात संपुष्टात येईल. आपली मनःस्थिती मनोरंजनात रमण्याची असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामगिरीने वरिष्ठांना प्रसन्न करतील. त्यामुळे आपणास बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील, ज्या व्यवसाय वृद्धी करण्यास उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात मिश्र परिणाम मिळतील. काही कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग पावेल व इच्छा असून सुद्धा अभ्यासावर त्यांचे लक्ष केंद्रित होऊ शकणार नाही. परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावेच लागेल. ह्या आठवड्यात आपणास एखादा नेत्र विकार किंवा त्वचा विकार होण्याची संभावना आहे.

राशी भविष्य

15-07-2025 मंगळवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण पंचमी

नक्षत्र : शततारका

अमृत काळ : 12:41 to 14:20

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:30 to 9:18 & 11:42 to 12:30

राहूकाळ : 15:59 to 17:38