Lokmat Astrology

दिनांक : 13-Jul-25

राशी भविष्य

 कन्या

कन्या

हा आठवडा आपणास सकारात्मक परिणाम देणारा आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस रात्री भोजनास घेऊन जाऊ शकतील. काही कारणामुळे आपणास एखादी चिंता सतावत असेल तर ती ह्या आठवड्यात दूर होईल. विवाहितांना त्यांच्या जोडीदारास दोषा सकट स्वीकारावे लागेल. जर भांडण होण्याची संभावना असली तर गप्प राहावे. अन्यथा भांडण वाढल्याचा आपणास त्रास होईल. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. जर ह्या आधी आपण कोणाला उसने पैसे दिले असतील तर ते ह्या आठवड्यात मिळण्याची संभावना आहे. आपणास जर एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची असेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. परंतु काही कामांचा त्यांना कंटाळा आल्याने समस्या सुद्धा निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामांसाठी एखाद्या वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल. कामात एखादी समस्या असल्यास चर्चा करून त्याचे निराकरण करून पूर्ण करावे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची इच्छा होऊ शकते. जर त्यांना आपल्या विषयात काही बदल करावयाचा असेल तर त्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ह्या आठवड्यात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकतात. ह्या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपणास उपवास करावा लागू शकतो. ह्या व्यतिरिक्त काही ऋतुजन्य विकार होण्याची शक्यता आहे, ज्या घरगुती उपचाराने आपण दूर करू शकता.

राशी भविष्य

13-07-2025 रविवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण तृतीया

नक्षत्र : श्रावण

अमृत काळ : 15:59 to 17:38

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:29 to 17:17

राहूकाळ : 17:38 to 19:17