Lokmat Astrology

दिनांक : 17-Apr-24

राशी भविष्य

 कुंभ

कुंभ

ह्या आठवड्यात आपले प्रेम संबंध दृढ होतील. आपल्या प्रेमिकेची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकाल, व त्यामुळे आपल्या विवाहास विलंब होणार नाही. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद अनुभवतील. जोडीदारासह कुटुंबाच्या कल्याणासाठी कार्य कराल. आर्थिक स्थिती ठीक राहील. आपण पूर्वी जी गुंतवणूक केली होती त्याचा पूर्ण लाभ मिळेल. आपले मित्र व नातेवाईक आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करतील. जे भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना खूप मोठा लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा प्रतिकूल आहे. आपले अभ्यासात लक्ष लागणार नाही. आपणास वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात.

राशी भविष्य

16-04-2024 मंगळवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ अष्टमी

नक्षत्र : पुष्य

अमृत काळ : 12:36 to 14:10

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:41 to 9:29 & 11:53 to 12:41

राहूकाळ : 15:45 to 17:19