lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 28-Apr-24

राशी भविष्य

 कुंभ

कुंभ

हा महिना आपल्यासाठी महत्वाचा आहे. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. जोडीदाराशी अशी काही बोलणी होतील कि त्यामुळे आपसात कटुता निर्माण होईल. हा महिना प्रणयी जीवनासाठी अनुकूल आहे. आपणास एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदमय असेल. ह्या महिन्यात आपणास स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल. आपण पूर्वी केलेल्या चुकांतून आपणास काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. आपण काय चुकीचे केले व काय केल्याने पुन्हा तशी चूक होणार नाही हे आपणास समजेल. असे झाल्याने आपल्या मनावरचे मोठे दडपण दूर होईल. मानसिक तणावा पासून मुक्ती मिळेल. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम होईल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती मजबूत होईल. व्यापारी वर्गास सरकारी क्षेत्रा कडून फायदा मिळू शकतो. आपल्या व्यवसायातील एखाद्या योजनेमुळे सुद्धा ह्या महिन्यात आपणास लाभ होऊ शकतो. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. ह्या महिन्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

28-04-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण चतुर्थी

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 15:45 to 17:21

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:33 to 17:21

राहूकाळ : 17:21 to 18:57