lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 28-Apr-24

राशी भविष्य

 मकर

मकर

ह्या महिन्यात आपल्या जीवनात चढ - उतार येतील. असे असले तरी विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात चांगले अनुभव येतील. आपल्या व्यक्तिगत जीवनात सुधारणा होईल. वैवाहिक जोडीदाराशी एखादी निर्णायक चर्चा होईल, जी आपल्या घरासाठी फायदेशीर ठरेल. प्रणयी जीवनासाठी हा महिना आव्हानात्मक आहे. आपली प्रेमिका क्रोधीत झाल्याचे दिसू शकते, व त्यामुळे आपसातील तणाव वाढू शकतो. हा महिना आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. आपली आर्थिक बाजू भक्कम होईल. बँकेतील गंगाजळी वाढवण्याची संधी सुद्धा मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा उंचावेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना परिश्रम करण्याचा आहे. आपणास आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करावा लागेल. व्यापाऱ्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागेल. सावधपणे नवीन लोकांना आपल्या बरोबर घेतल्यास लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल, अन्यथा त्रास होऊ शकतो. ह्या महिन्यात मानसिक चिंता आपणास त्रस्त करू शकतात. प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताणाचा नकारात्मक प्रभाव आपल्या पचन संस्थेवर होण्याची संभावना आहे. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

28-04-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण चतुर्थी

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 15:45 to 17:21

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:33 to 17:21

राहूकाळ : 17:21 to 18:57