Lokmat Astrology

दिनांक : 09-Oct-24

राशी भविष्य

 मीन

मीन

हा महिना आपणास अनुकूल आहे. ह्या महिन्यात आपले खर्च वाढले तरी कोणतीही समस्या उदभवणार नाही, कारण आपल्या प्राप्तीत सुद्धा भरपूर वाढ झालेली असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे. त्यांना आपल्या प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल. कार्यालयात आपल्या सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय साधला जाईल. कार्यालयीन वातावरण सकारात्मक राहील. त्यामुळे आपणास आपली कामगिरी उंचावण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना बाजारातील कल समजून घ्यावा लागेल व त्यानुसार काही नवीन योजना आखाव्या लागतील. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही ताण असल्याचे जाणवेल. आपण त्या बाबत जोडीदाराशी बोलण्याचा विचार कराल. परंतु तसे करताना भांडण होणार नाही याची काळजी घ्या. प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे. आपल्यातील दुरावा कमी होईल. आपण आपल्या प्रेमिकेच्या अधिक जवळ याल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते. आपण उच्च शिक्षणात प्रगती करू शकाल. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

09-10-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA शुक्ल​ षष्ठी

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 13:51 to 15:20

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:4 to 12:52

राहूकाळ : 12:23 to 13:51