lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 27-Apr-24

राशी भविष्य

 मिथुन

मिथुन

हा महिना आपल्यासाठी संस्मरणीय ठरणारा आहे. अनेक बाबीत आपणास चांगले परिणाम मिळतील. असे असले तरी विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अर्थात आपला जोडीदार आपल्या पाठीशी असेलच. प्रेमीजनांसाठी हा महिना चांगला आहे. आपण एखाद्या विशिष्ट पार्टीत सहभागी होऊ शकता. आपल्यातील समन्वय उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बढती मिळण्याची संभावना आहे. त्यासाठी आपण जरूर आपल्या वरिष्ठांचे आभार व्यक्त करा. आपण जर सरकारी नोकरीत असाल तर आपणास अजून हि चांगले लाभ मिळू शकतात. व्यापाऱ्यांना सरकारी फायदे मिळण्या व्यतिरिक्त त्यांच्या व्यापारात सुद्धा सुधारणा झाल्याचे दिसेल. आपल्या प्राप्तीत तेजी येईल. पूर्वी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून आपणास धन प्राप्ती होऊ शकते. आपली थकबाकी सुद्धा मिळू शकते. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागेल. त्यांचा अधिकतम वेळ इतर प्रवृत्तीत वाया जाऊ शकतो. ह्या महिन्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विनाकारण रागावल्यामुळे व अपरिपकव वर्तणुकीमुळे आपणास काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा बाळगू शकता. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

27-04-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण तृतीया

नक्षत्र : ज्येष्ठा

अमृत काळ : 06:10 to 07:46

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:46 to 8:34

राहूकाळ : 09:22 to 10:58