lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 28-Apr-24

राशी भविष्य

 मेष

मेष

ह्या महिन्यात आपणास अनेक प्रकारच्या चांगल्या बातम्या मिळू शकतात. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येतील. नात्यात नवीन ऊर्जा येईल. असे असले तरी प्रेमीजनांच्या नात्यात काही काळासाठी दुरावा येऊ शकतो, परंतु त्याने आपले नाते अधिक बळकट होईल. नात्यातील रोमांस वाढेल व प्रेमिके प्रति सुद्धा आपले आकर्षण वाढत असल्याचे दिसेल. आपण एकमेकांच्या सहवासात जास्त वेळ घालवाल. ह्या महिन्यात ग्रहांचे भ्रमण आपणास अनुकूल असल्याने आपण एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. ह्या महिन्यात आपणास नवीन वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. आपण घराचे नूतनीकरणाचे व अंर्तगत सजावटीचे काम करू शकता. ह्या महिन्यात आपणास थोडा जास्तीचा खर्च करावा लागू शकतो, परंतु आपल्या प्राप्तीत वृद्धी सुद्धा होईल. त्यासाठी आपण खूप परिश्रम सुद्धा कराल. नोकरी करणाऱ्यांची कामे चांगली होतील. वरिष्ठांशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल. कार्यालयात आपले नांव होऊन आपल्या पद - प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ह्या महिन्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. लहान - सहान समस्यांची जर काळजी घेतलीत तर मोठ्या समस्या टाळू शकाल. ह्या महिन्यात पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. ह्या महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

27-04-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण तृतीया

नक्षत्र : ज्येष्ठा

अमृत काळ : 06:10 to 07:46

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:46 to 8:34

राहूकाळ : 09:22 to 10:58