lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 28-Apr-24

राशी भविष्य

 मेष

मेष

अत्यंत कार्यक्षम असता व स्वतःचे काम स्वतःच करण्यास प्राधान्य देता. वर्षाच्या सुरवातीस गुरु आपल्या राशीस व शनी लाभस्थानी असल्यामुळे आपणास उत्तम अर्थ प्राप्ती होईल. योग्य निर्णय घेतल्याने जीवनात प्रगती करण्यात आपण यशस्वी व्हाल. आपण आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात योग्य निर्णय घेऊन जीवनात प्रगती कराल. आपली अर्थ प्राप्ती सुद्धा दिवसें - दिवस वाढतच राहील. असे असले तरी आपण अति आत्मविश्वासात राहू नये. शासन सुद्धा आपल्या पाठीशी राहील. परंतु व्ययातील राहू त्रास सुद्धा देत राहील. ह्या वर्षात आपणास आपल्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपले खर्च सुद्धा वाढतील. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. आपणास जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ती ह्या वर्षी पूर्ण होऊ शकते. आपणास परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. मनात दडून बसलेल्या जुन्या इच्छा पूर्ण होतील व त्यामुळे मन हर्षित होईल. आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी सुद्धा खूप काही कराल. तीचे हृदय जिंकण्यासाठी तिला एखादी चांगली भेटवस्तू सुद्धा द्याल. वडिलांशी असलेल्या संबंधात सुद्धा चढ - उतार येतील. नशिबाच्या प्राबल्यामुळे आपली कामे होतील. कोणतेही काम पैश्यां अभावी अडून राहणार नाही. आज पर्यंत आपल्या ज्या काही योजना पूर्ण झाल्या नव्हत्या त्या ह्या वर्षी पूर्ण होतील. हे वर्ष आपण अपेक्षा सुद्धा केली नसेल इतके जास्त चांगले आपणास देणार आहे. व्यक्तिगत संबंधात आपणास चांगले यश प्राप्त होईल. प्रणयी जीवनात एखादी सुखद बातमी सुद्धा मिळू शकते. हे वर्ष विवाहितांच्या वैवाहिक जीवनासाठी सुद्धा चांगले आहे. सासुरवाडी कडील लोक सुद्धा आपल्या पाठीशी उभे राहतील. काही नवीन लोकांच्या सहकार्याने व्यापारात प्रगतीची संधी मिळेल. आपल्या योजना फलद्रुप होतील. सरकारी क्षेत्राकडून आपणास चांगला लाभ प्राप्त होऊन आपणास मान - सन्मान व सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा मिळू शकते. ह्या वर्षी आपणास आपल्या आरोग्यावर सर्वात जास्त लक्ष द्यावे लागेल. इतर सर्व गोष्टीत आपोआपच सुधारणा होतील. ह्या वर्षात आपल्या प्रेमिकेस सोडून इतर स्त्री मध्ये आपले मन गुंतवू नये. अन्यथा सर्वांचे नुकसान होऊ शकते.

राशी भविष्य

27-04-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण तृतीया

नक्षत्र : ज्येष्ठा

अमृत काळ : 06:10 to 07:46

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:46 to 8:34

राहूकाळ : 09:22 to 10:58