Lokmat Astrology

दिनांक : 09-Oct-24

राशी भविष्य

 कुंभ

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्ती व्यवहार कुशल असतात. आपले म्हणणे पटवून देणारे व आपल्या वक्तव्याने समोरच्यास आश्चर्यचकित करणारे असू शकतात. आपण आपल्या नियमात कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यास तयार नसता. परंतु जे ध्येय बाळगून आपण काम करत असता ते पूर्ण केल्या शिवाय स्वस्थ बसत नाही. आपला राशिस्वामी शनी हे संपूर्ण वर्ष आपल्या राशीतच राहणार असल्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. आपण जास्त परिपकव झाल्याचे दिसून येईल. आपली परिपकवता आपल्या कामातून व आपल्या कृतीतून दिसू लागेल. व्यक्तिगत जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन असो, प्रत्येक ठिकाणी आपण उत्तम कामगिरी करत असल्याचे दिसून येईल. वर्षाच्या सुरवातीस आपली अर्थप्राप्ती व प्रकृती उत्तम असेल. कामाच्या ठिकाणी आपणास नव - नवीन कामे मिळतील जी आपण वेळेच्या पूर्वीच पूर्ण करून दाखवाल. त्यामुळे ह्या वर्षात आपणास एखादी मोठी संधी मिळू शकते. आपण एखादे काम असे करून दाखवाल कि ज्यामुळे आपणास एखादे बक्षीस सुद्धा मिळू शकेल. ह्या वर्षी सरकारी क्षेत्राकडून आपणास एखादा मोठा लाभ होणार आहे. आपणास जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर फेब्रुवारी व मार्च महिना त्यासाठी जास्त अनुकूल आहे. धर्म - कर्माच्या बाबतीत सुद्धा आपण खूप स्वारस्य दाखवाल. आपण एखाद्या मंदिर - मस्जिद किंवा धार्मिक ठिकाणी सेवा करण्यास प्राधान्य द्याल. धार्मिक संस्थेशी संबंधित एखाद्या ठिकाणी आपणास एखादे मोठे पद सुद्धा मिळू शकते. सध्या आपल्यावर राहूचा प्रभाव असल्याने अनेकदा आपण असे काही शब्द प्रयोग कराल जे समोरच्या व्यक्तीस अचंबित करू शकतील. आपण जे काही सांगाल त्यावर समोरची व्यक्ती सहजा - सहजी विश्वास ठेवणार नाही. कारण सांगताना आपण असे काही बोलाल कि ज्यावर कोणाचाही पटकन विश्वासच बसणार नाही. व्यापार व नोकरी अशा दोन्ही ठिकाणी आपली कामगिरी नजरेस भरेल. आरोग्याच्या बाबतीत आपण निश्चिन्त राहावे. कोणतीही मोठी समस्या निर्माण होणार नसली तरी केतुमुळे एखादी दडून बसलेली किंवा गुप्त समस्या त्रस्त करू शकते. वर्षाच्या सुरवातीस आपले कौटुंबिक जीवन खूपच सुखद असेल. आपणास आपल्या माता - पित्यांचे प्रेम मिळेल. त्यांच्यासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखू शकाल. वर्षभर कुटुंबियांचे प्रेम आपणास मिळेल. आपली मोठी भावंडे ह्या वर्षी आपणास खूप मदत करतील. ते आपली आर्थिक स्थिती उंचावण्यात आपल्याला सहकार्य करतील.

राशी भविष्य

09-10-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA शुक्ल​ षष्ठी

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 13:51 to 15:20

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:4 to 12:52

राहूकाळ : 12:23 to 13:51