10 सप्टेंबर, 2024 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल. संसारात आनंद वाटेल. धनप्राप्ती तसेच बढती संभवते.