lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 28-Apr-24

राशी भविष्य

 वृश्चिक

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्ती आपल्या गोष्टी गुप्त ठेवण्यात तरबेज असतात. ह्या वर्षी आपणास ह्याचा खूपच चांगला फायदा होणार आहे. आपण आपल्या गुप्त योजना इतरां पासून गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ह्या वर्षी आपण खूप काही प्राप्त करू शकाल. वर्षाची सुरवात आपल्यासाठी खूपच चांगली होईल. आपले चुंबकीय आकर्षण लोकांच्या डोक्यावर बसेल व आपल्या चाहत्या वर्गात वाढ होईल. आपण पुरुष असा किंवा महिला, आपणास लोक पसंत करतील. त्यामुळे आपली बरीचशी कामे होतील. वैवाहिक जीवनात सुद्धा प्रेम व रोमांस बरोबरीत राहतील. हे वर्ष प्रणयी जीवनासाठी चढ - उतारांचे आहे. आपणास आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर व्यक्त करण्यात थोडा संकोच वाटेल. अनेकदा आपण जरुरीपेक्षा जास्त बोलाल, जे तिला आवडणार नाही. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. कुटुंबीयांची प्रकृती, विशेषतः वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती आपणास त्रस्त करू शकते. आपणास जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर ह्या वर्षी आपण त्यात यशस्वी होऊ शकाल. कौटुंबिक दृष्ट्या समाजात आपली स्थिती मजबूत होईल. नोकरीत व व्यापारात आपणास कठोर प्रयत्न केल्यावरच यश प्राप्त होऊ शकते. आपले व्यक्तिमत्व सुधारण्यावर आपला भर राहील. ह्या वर्षी मे महिन्या पर्यंत परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. त्या नंतर आपला विवाह होऊ शकतो. आपण जर अजून अविवाहित असाल तर ह्या वर्षी आपला विवाह होण्याची दाट संभावना आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांना सुद्धा यश मिळू शकते. हे वर्ष प्रकृतीच्या बाबतीत काहीसे प्रतिकूल असू शकते, तेव्हा आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करत राहावे. वर्षाच्या सुरवातीस अचानकपणे आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे. ह्या वर्षी एखादा नवीन व्यवसाय सुरु करू शकता. वर्षाच्या सुरवातीस कोणाशीही वेडे - वाकडे बोलू नये. अन्यथा आपली होऊ घातलेली कामे सुद्धा बिघडू शकतात व कामात खोळंबा होऊ शकतो. ह्या वर्षी आपल्या बहुतांश इच्छा पूर्ण होतील, तेव्हा आनंद साजरा करा, परंतु पाय जमिनीवरच ठेवा. आपल्या माणसांवर प्रेम करा. कोणालाही आपल्या द्वारा निराश होण्याची संधी देऊ नका. त्यामुळे ह्या संपूर्ण वर्षात आपण यशस्वी होऊ शकाल.

राशी भविष्य

28-04-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण चतुर्थी

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 15:45 to 17:21

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:33 to 17:21

राहूकाळ : 17:21 to 18:57