Lokmat Astrology

दिनांक : 09-Oct-24

राशी भविष्य

 मीन

मीन

मीन राशीच्या व्यक्ती स्वभावाने कष्टाळू व शिक्षणास महत्व देणारे असतात. इतकेच नव्हे तर ते खूपच भावनाप्रधान सुद्धा असतात. भावनाप्रधान असल्याने लोक अनेकदा त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांना रडवतात. ह्या वर्षी आपणास अति भावनाप्रधान होणे टाळावे लागेल, अन्यथा आपले त्रास वाढू शकतात. आता हे संपूर्ण वर्ष राहू आपल्या राशीतून भ्रमण करणार आहे. त्यामुळे आपल्या वागण्या - बोलण्यात फरक पडेल. आपण जे काही सांगाल ते पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे आपणास मानसिक नैराश्याचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. जे करण्यास आपण असमर्थ असाल ते आपण करू शकतो असे कोणालाही सांगू नका. अन्यथा ते आपणास वेडे - वाकडे काहीही बोलतील व त्यामुळे भावनिक दृष्ट्या आपण दुखावले जाल. आपण जर कोणाशी भावनिक नात्याने गुंतला असाल किंवा विवाहित असाल तर आपल्या जोडीदारास चुकून सुद्धा वेडे - वाकडे काही बोलू नका. सध्या आपल्या सप्तमातून केतुचे भ्रमण होत असल्याने आपल्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊन आपल्या नात्यात कटुता येऊ शकते. तेव्हा आपणास खूपच सावध राहावे लागेल. ह्या वर्षी आपणास कारकिर्दीत चांगले यश प्राप्त होणार आहे. सरकारी क्षेत्रात सुद्धा एखादे मोठे पद मिळू शकते. आपणास राजकारणात यशस्वी होण्याची संधी मिळू शकते. परदेश गमन होण्याची दाट संभावना आहे. आपण जर अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर ह्या वर्षी आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. आपण परदेशात जाण्यास विलंब करणार नाहीत. त्यामुळे आपले खर्च तर वाढतीलच, परंतु उत्तम स्थैर्य सुद्धा लाभेल. गुरुकृपेने आर्थिक प्राप्तीत वाढ होऊन बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल. आपणास जर आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर वर्षाच्या सुरवातीस ती करणे टाळावे. ह्या वर्षी आपली प्रकृती काहीशी बिघडू शकते व त्यामुळे उपचारांवर खर्च सुद्धा होऊ शकतो. वर्षाच्या सुरवाती पासूनच कुटुंबीय खुश राहतील. वेळोवेळी ते आपणास सहकार्य करतील व आपल्या पाठीशी उभे राहतील. त्याचा आपणास जीवनातील विविध क्षेत्रात खूप मोठा लाभ होईल. वर्षाच्या सुरवातीस आपली भावंडे सुद्धा आपल्या पाठीशी राहतील. त्यांच्यासह आपण दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. रजेवर जाऊन दूरवरचे प्रवास केल्याने आपल्यातील समन्वय व प्रेम सुद्धा वाढेल. आपण त्यांच्यासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न कराल, परंतु त्यासाठी आपणास पैश्यांची चणचण भासू शकते. अशा वेळी आपला जोडीदार आपणास मदत करेल.

राशी भविष्य

09-10-2024 बुधवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA शुक्ल​ षष्ठी

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 13:51 to 15:20

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:4 to 12:52

राहूकाळ : 12:23 to 13:51