ह्या आठवड्यात विवाहित व्यक्ती आनंदात राहतील. कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखतील. प्रेम विवाहाची संभावना आहे. विवाहेच्छुकांसाठी त्यांच्या पसंतीस उतरेल असे चांगले स्थळ येईल. हा आठवडा खर्चिक आहे. रोजची प्राप्ती चांगली झाल्याने आपणास त्याचा काही त्रास होणार नाही. व्यापाऱ्यांना चांगला लाभ प्राप्त होईल. प्रकृतीत पूर्वी पेक्षा जास्त सुधारणा होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. आपल्यावर वडीलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. घर, दुकान, प्लॉट इत्यादी खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यात यश प्राप्त होईल. मुलास चांगली नोकरी लागल्याने माता - पिता आनंदित होतील. ह्या आठवड्यात कौटुंबिक समस्या आपले लक्ष वेधून घेतील व त्यामुळे आपण लक्षपूर्वक अभ्यास करू शकणार नाही.