Lokmat Astrology

दिनांक : 12-Jul-25

राशी भविष्य

 मिथुन

मिथुन

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. अहंकारामुळे प्रेमीजनांच्या नात्यात समस्या निर्माण होतील. त्यांना आपल्या प्रेमिकेवर सुद्धा विश्वास ठेवावा लागेल. अन्यथा समस्या वाढतील. विवाहित व्यक्तीनी जोडीदाराची विचारपूस करून त्यांच्या गरजांवर लक्ष द्यावे. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम दृढ होईल. ह्या आठवड्यात आपण आवश्यक तितका खर्च करणे हितावह होईल. इतरांना प्रभावित करण्यासाठी खर्च केल्यास आपली आर्थिक स्थिती नाजूक होईल. त्या नंतर आपणास आर्थिक चणचण जाणवू शकते. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात खुशखबर ऐकण्यास मिळेल. त्यांच्या योजना गती घेतील व त्यामुळे आर्थिक समस्येतून त्यांना दिलासा मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी सध्याची नोकरी सोडू नये. ह्या आठवड्यात आपल्या मनाचा गोंधळ उडाल्याने आपण त्रस्त व्हाल. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाल्याने परीक्षेत त्यांचे नुकसान होण्याची संभावना आहे. तेव्हा त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. ह्या आठवड्यात आपणास रक्ताशी संबंधित आजार होण्याची संभावना आहे. तेव्हा आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. योग्य ते उपचार करावेत.

राशी भविष्य

12-07-2025 शनिवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण द्वितीया

नक्षत्र : उत्तराषाढा

अमृत काळ : 06:05 to 07:44

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:41 to 8:29

राहूकाळ : 09:23 to 11:02