Lokmat Astrology

दिनांक : 16-Nov-25
Daily Top 2Weekly Top 5

राशी भविष्य

 तूळ

तूळ

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेच्या मनमानीपणामुळे त्रासून जातील. एखाद्या गोष्टीने प्रेमिका त्यांच्यावर शंका घेऊ शकते. वैवाहिक जीवनात असमंजसपणामुळे समस्या वाढतील. तसेच एखादी बाहेरची व्यक्ती आपल्या नात्यात तणाव निर्माण करू शकेल. व्यावसायिकांना एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. त्यांचे सहकारी कामात सहकार्य करतील. ह्या आठवड्यात आपण दिखाऊपणा करू नये. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित पदोन्नती मिळण्याची संभावना आहे.ह्या आठवड्यात विद्यार्थी जास्त मेहनत करतील. त्यांना त्याचे यथायोग्य फळ मिळेल. ते एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. त्यांचा एखादा प्रकल्प जर अपूर्ण राहिला असेल तर तो सुद्धा ते पूर्ण करू शकतील. उच्च शिक्षणास आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य विषयक एखादी लहान समस्या असली तर वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा. अन्यथा हि समस्या मोठ्या आजारात परिवर्तित होऊ शकते.

राशी भविष्य

16-11-2025 रविवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण द्वादशी

नक्षत्र : हस्त

अमृत काळ : 15:09 to 16:33

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 17:7 to 17:55

राहूकाळ : 16:33 to 17:57