Lokmat Astrology

दिनांक : 14-May-25

राशी भविष्य

 मकर

मकर

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात आपण कामात इतके व्यस्त राहाल कि आपल्या प्रेमिकेस अत्यंत थोडा वेळ देऊ शकाल. कौटुंबिक समस्यांमुळे विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु त्या दूर करण्यात आपण यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्ट्या आठवडा चांगला आहे. काही आर्थिक अडचणी आल्या तरी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून रग्गड पैसा मिळाल्याने हे अडथळे सहजपणे दूर होतील. ह्या आठवड्यात आपण घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा अरु शकता. ह्या आठवड्यात कोणाशीही उसनवारी करू नये. व्यापाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. कोणत्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करावी व कोणत्यात करू नये हे न समजल्याने आपला गोंधळ उडेल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात सतर्क राहावे लागेल. आपले काही सहकारी आपल्या विरुद्ध एखादे नवीन षडयंत्र रचू शकतात. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान वाढविण्यावर भर द्यावा. त्यांच्या अभ्यासात येत असलेल्या समस्या एखाद्या अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून दूर होऊ शकतील. ह्या आठवड्यात आपणास प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आपणास गुढघे दुखीचा त्रास होण्याची संभावना आहे.

राशी भविष्य

13-05-2025 मंगळवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण प्रतिपदा

नक्षत्र : विशाखा

अमृत काळ : 12:32 to 14:10

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:26 to 9:14 & 11:38 to 12:26

राहूकाळ : 15:47 to 17:25