lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 28-Apr-24

राशी भविष्य

 तूळ

तूळ

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणावामुळे त्रस्त होतील, परंतु जोडीदार आपल्या पाठीशी राहण्याचा भरपूर प्रयत्न करेल त्यामुळे आपला त्रास दूर होऊ शकेल. प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी सुद्धा घालू शकता. असे असले तरी ती आपल्या एखाद्या कृत्यामुळे क्रोधीत होण्याची संभावना सुद्धा आहे. मात्र, नंतर ती शांत होईल. आपसात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करणे हितावह होईल. आपणास खूप मेहनत करावी लागेल. आपण जितके जास्त प्रयत्न कराल तितकेच आपले फायदे होतील. आपला स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. आव्हाने तर येत जातील. परंतु आपण आपल्या कौशल्याने त्यातून सुटका मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागेल. त्याचा प्रभाव आपल्या कामगिरीवर होताना दिसून येईल. तेव्हा आपल्या कडून उत्तम करण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांना एकाच वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. परंतु, महिन्याच्या उत्तरार्धात ते चांगली कामगिरी करू शकतील. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे. अभ्यासातील चांगल्या कामगिरीने ते खुश होतील. हा महिना प्रकृतीच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. रोज सकाळ - संध्याकाळ चालावयास जावे. योगासन सुद्धा करू शकता. मानसिक ताण सुद्धा वाढेल. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकल आहे.

राशी भविष्य

28-04-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण चतुर्थी

नक्षत्र : मूळ

अमृत काळ : 15:45 to 17:21

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:33 to 17:21

राहूकाळ : 17:21 to 18:57