Lokmat Astrology

दिनांक : 05-Jul-25

राशी भविष्य

 कर्क

कर्क

हा महिना आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या महिन्यात आपणास आपल्या जोडीदाराची एखादी गोष्ट रुचणार नसल्याची संभावना असल्याने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. तेव्हा विचारपूर्वक संवाद साधावा. विवाहितांना जोडीदाराची पूर्ण साथ लाभल्याने जीवनात कोणतीही समस्या उदभवणार नाही. ह्या महिन्यात आपण आवश्यक तितकाच खर्च करणार असल्याने खर्चात कपात करण्याच्या प्रयत्नात आपल्याला यश प्राप्त होईल. ह्या महिन्यात आपण आपली बचत सुद्धा वाढवू शकाल. व्यापाऱ्यांना ह्या महिन्यात चांगले परिणाम मिळतील. त्यांनी त्यांच्या व्यवसायात काही बदल केला तर येणाऱ्या काळात त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना एखादे जवाबदारीचे काम मिळाल्याने थोडे टेन्शन वाढू शकते. मात्र ते त्यास सहजपणे दूर करू शकतील. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवावी लागेल. ह्या महिन्यात आपण आपल्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष द्याल. त्यासाठी आपण योगासन सुद्धा करू शकाल. असे केल्याने आपणास आरोग्य विषयक चांगले परिणाम मिळू लागतील. एखादी समस्या असल्यास ती सुद्धा बहुतांशी दूर होऊ शकेल.

राशी भविष्य

05-07-2025 शनिवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA शुक्ल​ दशमी

नक्षत्र : स्वाती

अमृत काळ : 06:03 to 07:42

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:39 to 8:27

राहूकाळ : 09:21 to 11:01