Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:15 IST2026-05-19T16:14:17+5:302026-05-19T16:15:23+5:30

Ebola Virus : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे

world health organization ebola virus uganda congo public health emergency | Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी

फोटो - Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कांगो आणि युगांडामध्ये इबोलाच्या साथीमुळे 'इंटरनॅशनल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी' घोषित करण्यात आली. इमर्जन्सी समितीची स्थापना करण्यापूर्वीच पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांच्या कलम १२ अंतर्गत दोन्ही देशांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. आज इमर्जन्सी समितीची बैठक बोलावण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, इटुरी येथून ३० रुग्ण समोर आले आहेत. युगांडाची राजधानी कंपाला येथेही काही रुग्णांची पुष्टी झाली आहे.

संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ

संक्रमण आणखी पसरू शकते आणि मृतांची संख्या वाढू शकते असा इशारा WHO ने दिला आहे. ५०० हून अधिक संशयित रुग्ण आणि १३० जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. हे आकडे पुढे बदलू शकतात. आरोग्य कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इटुरी प्रांतात सध्या असुरक्षिततेचं वातावरण आहे. तिथे लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होते. याच कारणामुळे संसर्ग आणखी पसरण्याचा धोका वाढला आहे.

इबोला म्हणजे काय?

इबोला हा एका धोकादायक व्हायरसमुळे होणारा आजार आहे. अनेक प्रकरणांमध्ये हा जीवघेणा ठरू शकतो. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवपदार्थ, जसं की रक्त, उलट्या, घाम किंवा वीर्य यांच्या संपर्कात आल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्यासाठी ओळखला जातो.

WHO ने माहिती दिली आहे की ही साथ 'बंडिबुग्यो व्हायरस'मुळे पसरली आहे. हा इबोला व्हायरसचाच एक प्रकार आहे, ज्याच्यावर कोणतीही लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नाही. लस उपलब्ध नसली, तरी व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांची जीव वाचवण्यासाठी देश इतर अनेक पावलं उचलू शकतात. यामध्ये लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं आणि जनजागृतीमध्ये समुदायाचा सहभाग वाढवणं यांसारख्या उपायांचा समावेश आहे.

Web Title : इबोला का प्रकोप बढ़ा: डब्ल्यूएचओ ने जारी किया अलर्ट, सैकड़ों संक्रमित, मौतें बढ़ीं।

Web Summary : डब्ल्यूएचओ ने कांगो और युगांडा में इबोला के प्रकोप के कारण अंतर्राष्ट्रीय स्वास्थ्य आपातकाल घोषित किया। 500 से अधिक संदिग्ध मामले और 130 मौतें दर्ज की गई हैं। प्रकोप बुंडिबुग्यो वायरस के कारण हुआ है, जिसके लिए कोई टीका उपलब्ध नहीं है। रोकथाम सार्वजनिक जागरूकता और सामुदायिक भागीदारी पर केंद्रित है।

Web Title : Ebola outbreak worsens: WHO issues alert, hundreds infected, deaths rise.

Web Summary : WHO declared an international health emergency due to the Ebola outbreak in Congo and Uganda. Over 500 suspected cases and 130 deaths are reported. The outbreak is caused by the Bundibugyo virus, for which no vaccine is available. Prevention focuses on public awareness and community involvement.