पक्षी जाय दिगंतरा; हजारो किमी प्रवास करुन परदेशी पाहुणे सागरी किनारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:19 PM2019-07-22T23:19:24+5:302019-07-22T23:24:04+5:30

पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीला लाभलेला ११० किमीचा प्रशस्त सागरी किनारा आणि या किनाऱ्यालगतच्या नारळी-पोफळीच्या बागायती या निसर्गरम्य भागाची भुरळ आता परदेशी पाहुण्यांना (पक्षी) तसेच स्थलांतरित पक्ष्यांना पडली आहे. (छायाचित्र -प्रीतम घरत)

वर्षभरात लाखो किमी.चा खडतर टप्पा पार करत या शांत आणि निर्धोक वातावरणात आलेले अनेक सुंदर पक्षी सध्या या भागात दिसून येत आहेत.

नायगाव ते झाई - बोर्डी दरम्यानच्या समुद्र किनाºयावर आढळणारे फ्लेमिंगो, सिगल, व्हाइट थ्रो किंगफिशर, कॉमन किंगफिशर, ग्रीन शांक, रुडी शेल डक, पाणकावळे, हुपु, पेंटेड स्टोर्क तर ग्रेटर कुकु, हरियाल, युरेशिअन कुकु, ग्रे फ्रँकोलीन आदी अनेक स्वदेशी - परदेशी पक्ष्यांचा सहभाग येथे वाढला आहे.

तालुक्यातील केळवे, माहीम, शिरगाव, एडवण, दातीवरे, पालघर, (पूर्व) आदी भागातील पाणथळ जागा, किनारपट्टी, बागायती क्षेत्रात या पक्ष्यांचा अधिवास आढळून येतो. लहान आकारातील या पक्षाचे अनेक जातभाई आढळत असून लहान खंड्या, कवडा खंड्या, काळ्या डोक्याचा खंड्या, तिबोटी खंड्या, घोंगी खंड्या, मलबारी खंड्या आदी विविध नावाने त्यांना ओळखले जाते.

पिवळसर-तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या शेपटी पार्ट पंखाच्या काळ्या पांढºया रंगाचे पट्टे असतात. याची पटकन लक्षात येणारी आणखी एक खूण म्हणजे जे डोक्यावरचा शेंडी सारखा तुरा हा पक्षी दचकला की सरकन त्याचा तुरा विस्फारला जातो.

नाकतोंडे, झुरळ, टोळ, मुंग्या आदी किडे हे पक्ष्याचे भक्ष्य असून शेतीमध्ये उगवलेल्या धान्याचा नाश करणाºया अनेक किड्यांना हा पक्षी आपले भक्ष्य बनवित असल्याने याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागात या पक्ष्याला सुतार नावाने ओळखले जाते.