युवराज सिंगची Ex गर्लफ्रेंड करतेय ४८ वर्षीय टेनिस स्टार लिएंडर पेसला डेट?; गोव्यात करतायेत सुट्टी एन्जॉय, Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 04:33 PM2021-07-14T16:33:40+5:302021-07-14T16:35:06+5:30

भारतीय संघाचा माजी अष्टैपूल खेळाडू युवराज सिंग ( Yuvaraj Singh) याचे लग्नापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले. त्यापैकी एक बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा सध्या गोव्यात सुट्टीसाठी गेली आहे. पण, या सुट्टीत ती भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस ( Leander Paes) याच्यासोबत दिसत आहे.

लिएंडर आणि किम यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा रंगल्या. मुंबईत या दोघांना एकत्रही पाहिलं गेलं, परंतु आता गोव्यातील त्यांच्या फोटोमुळे त्यांचं अफेअर लपून राहिलेलं नाही.

लिएंडर व किम या दोघांचे गोव्यातील फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात ही दोघं एकमेकांसोबत जेवताना व रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

किम शर्मानं तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केला अन् त्यावर तिनं फोटो क्रेडीत मिस्टर पी. याला दिले आहे.

यापूर्वी लिएंडर पेस आणि रिया पिल्लई हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दोघांना एक मुलगी आहे.