दीपिका पदुकोणच्या 'प्रेग्नन्सी ग्लो'चं सिक्रेट! दुसऱ्यांदा आई होताना फॉलो करतेय 'या' ५ गोष्टी - लूक दिसतो फ्लॉलेस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 19:00 IST2026-04-20T19:00:00+5:302026-04-20T19:00:02+5:30

Deepika Padukone pregnancy beauty secrets : Deepika Padukone flawless look pregnancy : Deepika Padukone's beauty secrets for glowing skin during pregnancy : दीपिकाने प्रेग्नंन्सीमध्येही अतिशय काटेकोर पद्धतीने आपले डेली रुटीन सांभाळले आहे...

बॉलिवूडमधील पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या आयुष्यातील आणखी एका आनंदाची बातमी चाहत्यांसोबत नुकतीच शेअर केली आहे. दुसऱ्या बाळाच्या आगमनाची ही गोड बातमी ऐकून चाहतेही खुश झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रेग्नंन्सीदरम्यानही दीपिकाचा ग्लो, आत्मविश्वास आणि फ्लॉलेस लूक सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो.

पण सध्या सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या दीपिकाच्या 'प्रेग्नन्सी ग्लो'वर! गरोदरपणातही दीपिका ज्या पद्धतीने स्वतःला कॅरी करत आहे आणि तिचा लूक जितका फ्लॉलेस दिसत आहे, ते पाहून अनेकजणी आश्चर्यचकित होतात.

वाढत्या वजनासोबतच त्वचेच्या आणि आरोग्याच्या अनेक समस्या या काळात सतावतात, मात्र दीपिकाने अतिशय काटेकोर पद्धतीने आपले डेली रुटीन सांभाळले आहे.

अशा विशेष प्रेग्नंन्सीच्या दिवसांतही ती स्वतःची काळजी कशी घेते, कोणत्या छोट्या-छोट्या गोष्टी फॉलो करते आणि स्वतःला कसं मेंटेन ठेवते आपले सौंदर्य आणि फिगर याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकीलाच असते.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या दुसऱ्या बाळाची अधिकृत घोषणा केली आहे. पहिल्या प्रेग्नन्सीच्या काळातही दीपिकाचा अंदाज अत्यंत कूल आणि तिचा चेहरा नेहमीच ग्लोइंग दिसत असे. या काळात ती आपल्या त्वचेची (Skin) विशेष काळजी घेते. खरं तर, गरोदरपणात शरीरात असे काही नैसर्गिक बदल होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक किंवा 'ग्लो' येतो. दीपिका या नैसर्गिक सौंदर्यासोबतच आपल्या स्किनकेअर रुटीनमध्येही काही खास गोष्टींचा समावेश करते.

दीपिका आपल्या चमकणाऱ्या त्वचेसाठी नेहमी घरचे पौष्टिक जेवण घेण्यालाच अधिक पसंती देते. गरोदरपणात बाहेरचे पदार्थ खाणे जितके टाळाल, तितके ते तुमच्या आरोग्यासाठी आणि बाळासाठी फायदेशीर असते. या दिवसांत घरच्या सात्विक आहारामुळे तुमच्या त्वचेवर एक वेगळाच आणि नैसर्गिक ग्लो येतो.

गरोदरपणात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी दिवसातून भरपूर पाणी आणि नारळ पाणी देखील पिणं फायदेशीर ठरते. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि त्वचा निस्तेज किंवा निर्जीव दिसू लागते. त्यामुळे, चमकदार त्वचेसाठी स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवा.

ज्या महिलांची त्वचा तेलकट (Oily Skin) असते, त्यांना गरोदरपणात त्वचेवर बारीक पुरळ किंवा दाणे येण्याची समस्या जाणवू शकते. अशा वेळी स्किन केअर प्रॉडक्ट्सचा कमीत कमी वापर करणे फायदेशीर ठरते. प्रमाणापेक्षा जास्त सौंदर्य प्रसाधने वापरल्यास त्याचा तुमच्या त्वचेवर उलट परिणाम होऊन त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे या दिवसांत शक्यतो नैसर्गिक पद्धतीनेच त्वचेची काळजी घेण्यावर अधिक भर द्यावा.

दीपिका आपल्या बिझी शेड्युलमधून आठवड्यातला एक दिवस खास स्किन आणि हेअर केअरसाठी राखून ठेवते. या दिवशी ती त्वचेची आणि केसांची मालिश, फेसमास्क आणि हेअर मास्क लावण्यासाठी पुरेसा वेळ काढते. यामुळे आठवडाभरात त्वचेवर आणि केसांवर जमा झालेली घाण व अशुद्धी बाहेर निघण्यास मदत होते आणि त्वचा पुन्हा टवटवीत होते.