Eugenie Bouchard: ID कार्डवरील बिकिनीतील फोटो पाहून टेनिस स्टारची सटकली; जाणून घ्या असं का झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 04:49 PM2022-08-20T16:49:31+5:302022-08-20T17:05:40+5:30

कॅनडाची स्टार टेनिसपटू युजेनी बौचार्ड सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आपल्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या या टेनिसपटूने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे.

युजेनी बौचार्ड व्हँकुव्हर येथे होणाऱ्या ओडलम ब्राउन वेओपनमध्ये भाग घेत आहे. पण यामुळे ती खूप नाराज असून तिने आपली नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त केली आहे. या स्पर्धेसाठी तिचे ओळखपत्र बनवण्यात आले आहे, त्यावरून ती प्रचंड नाराज असून तिने त्याचा फोटोही इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यामुळे या आयडी कार्डचा फोटो खूप व्हायरल होत आहे. या ओळखपत्रावरील फोटो बिकनीतील असल्यामुळे ती चांगलीच संतापली.

कॅनडाची स्टार टेनिसपटू युजेनी बुकार्ड ओळखपत्रामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. दरम्यान, आपली चूक मान्य करत स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी युजेनीच्या ओळखपत्रामध्ये बदल करून जुना फोटो हटवला आहे. जुना फोटो बिकनीतील असल्यामुळे ती नाराज झाली होती. परंतु नवीन फोटो लावल्यानंतर युजेनीने तो पुन्हा शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करताना म्हटले की, आता खरा फोटो मिळाला आहे.

तिच्या बिकनीमधील हा फोटो २०१८ मधील आहे, जो एका मॅगझिनसोबत शूट दरम्यान काढण्यात आला होता. युजेनी बौचार्ड मोठ्या कालावधीनंतर व्हँकुव्हर ओपनमध्ये भाग घेणार आहे. तब्बल १७ महिने ती टेनिस कोर्टपासून दूर होती. कोर्टापासून दूर राहण्याचे कारण दुखापत आणि त्यामुळेच पुनरागमन करण्यासाठी मोठा कालावधी लागला असल्याचे तिने सांगितले.

युजेनीचा सोशल मीडियावरील चाहता वर्ग खूप मोठा आहे. इंस्टाग्रामवर २३ लाखांहून अधिक तिचे फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून अधूमनधून फोटो किंवा व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करतात.

युजेनीचे इंस्टाग्राम अकाउंट विविध प्रकारच्या फोटोंनी भरले आहे. आपल्या खेळाच्या व्हिडीओंसोबत ती अनेकदा पार्टीत जाणे किंवा फिरायला जाण्याबद्दलच्या पोस्ट अपलोड करत असते. युजेनीचे लाखो चाहते नेहमी तिच्या नव्या फोटोंची अर्थात नव्या लूकची वाट पाहत असतात. युजेनी बौचार्डच्या इंस्टाग्रामवर तब्बल १,६२६ पोस्ट आहेत.