लय भारी! बुलढाण्याच्या शेतकऱ्यानं पिकवला ९ किलोंचा मुळा; 'मॉन्स्टर मुळा' पाहून तुम्हीही व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 05:12 PM2021-03-21T17:12:38+5:302021-03-21T17:44:25+5:30

Maharashtra farmer 9 kg radish buldhana :शेतकऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या मुळ्यांच वजन ९ किलो आहे.

आपल्या सगळ्यांच्याच जेवणात मुळ्याचा समावेश असतो. कोणाला कच्चं खायला आवडतं तर कोणी मुळ्याचा किस किंवा भाजी बनवून मुळ्याचे सेवन करतात.

पांढरे शुभ्र मुळे पाहिल्या पाहिल्याच लोक आकर्षित होतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यानं ९ किलोंचा मुळा पिकवला आहे. आता या मोठ्याच्या मोठ्या मुळ्याला मॉन्स्टर मुळा नावानं ओळखलं जात आहे.

महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमधील गौत्रा गावात असा मुळा पिकवला आहे. या ठिकाणी रामनाथ मुंडे शेतीचं काम करतात. नेहमीप्रमाणे यावेळीही त्यांनी मुळा पिकवला होता.

मुंडे यांच्या म्हणण्यानुसार ते नेहमीच पिकांना योग्य खत आणि पाणी देतात. पीकं आल्यांतर जेव्हा त्यांनी मुळे काढायला सुरूवात केली.

तेव्हा त्यातील एक मुळा काढण्यासाठी खूपच मेहनतलागली. जेव्हा तो मुळा पूर्णपणे बाहेर काढला तेव्हा आजूबाजूला उपस्थित असलेले लोकही अवाक् झाले. अरे बापरे! एवढा मोठा मुळा. अशीच सगळ्यांची रिएक्शन होती.

शेतकऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या मुळ्यांच वजन ९ किलो आहे.

हा मुळा सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये ही गोष्ट पोहोचल्यानंतर सगळेचजण या शेतात मुळा पाहण्यासाठी येत आहेत.