Baba Vanga यांची भविष्‍यवाणी: 2021 मध्ये येणार प्रलय, चीन करणार जगावर कब्जा, डोनाल्ड ट्रम्प होणार बहिरे

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 26, 2020 02:07 PM2020-12-26T14:07:25+5:302020-12-26T14:33:44+5:30

बुल्‍गारिया येथे राहणाऱ्या बाबा वेंगा यांनी वर्ष 2021संदर्भात सर्वांनाच हादरवून सोडणाऱ्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांना बाल्कनचा नॉस्ट्रॅडेमस म्हटले जात होते. बाबा वेंगा यांनी काही अशा एतिहासिक घटनांसंदर्भात भविष्यवाण्या केल्या होत्या त्या पुढे चालून तंतोतंत खऱ्या ठरल्या. 1911 मध्ये जन्मलेल्या वेंगा यांना वयाच्या 12व्या वर्षी अंधत्व आले होते.

यापूर्वीही सत्य सिद्ध झाल्या आहेत भविष्यवाण्या - बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 मध्ये झाला. मात्र त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच सोव्हियत युनियनचे विघटन, 9/11 अॅटॅक (2001), प्रिंसेस डायना यांचा मृत्यू (1997), चेर्नोबिलची आपत्ती आणि जापान स्तुनामी (2004) सारख्या ऐतिहासिक भविष्यवाण्या केल्या होत्या.

असे म्हटले जाते, की बाबा वेंगा यांनी केलेल्या जवळपास 85 टक्के भविष्यवाण्या सत्य सिद्ध झाल्या आहेत. यांच्या भविष्यवाण्यांमध्ये 5079 पर्यंतचा उल्लेख आढळतो, असे वर्ष ज्यात जगाचा अंत होईल.

आकाशातून धोका - भविष्यवाणीनुसार, 2021मध्ये रशियाच्या जवळपासच्या भागावर उल्का पडतील. केवळ नैसर्गिक आपत्तींनेच जग नष्ट होण्याची भीती नाही, तर युरोपात रासायनिक हल्ल्यांचाही इशारा देण्यात आला आहे. एवढेच नाही, तर यादरम्यान युरोप खंडाचे अस्तीत्वच आपल्या अंताच्या जवळ पोहोचू शकते, अशी भविष्यवाणीही बाब वेंगांनी केली आहे.

पुतीन यांच्या हत्येचा कट - व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येसंदर्भातही बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्यानुसार, 2021 मध्ये युरोप वाईट आर्थिक संकटांचा सामना करेल. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचला जाईल. देशाच्या सीमेतच त्यांच्या जीवाला धोका वाढेल.

ट्रम्प यांना होणार मोठा आजार - बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एखादा मोठा आजार होईल. हा आजार ट्रम्प यांना बहिरं करेल. एढेच नाही, तर त्यांना ब्रेन ट्रॉमा होण्याचीही शक्यता आहे.

भयावह आपत्ती - संपूर्ण जग भयावर आपत्तीच्या संकटांचा सामना करेल. लोकांच्या चेतनेत मोठा बदल होईल. हा एख कठीन काळ असेल. लोक आस्थेच्या नावावर विभागले गेलेले असतील. सध्य स्थितीत, आपण मानवतेवर प्रहार कणाऱ्या अनेक घटनांचे साक्षिदार आहोत.

ब्रह्मांडात जीवनाचा शोध ब्रह्माण्डात जीवनाचा शोध घेतला जाईल आणि अचानकपणे पृथ्वीवर जीवन कसे आढळले? हे स्पष्ट होईल. पुढील 200 वर्षांत लोक आपल्या आध्यात्मिक भाऊ-बहिणींशी दुसऱ्या जगात संपर्क सधतील.

आकाशात उडतील ट्रेन - सूर्य प्रकाशाचा वापर करून रेल्वे उडवल्या जातील. पेट्रोलचे प्रोडक्शन बंद होईल. खरे, तर सोलार एनर्जीसंदर्भात लोकांमध्ये आताच चर्चेला सुरुवात झाली आहे.

चीनचा जगावर कब्जा - एक विशालकाय ड्रॅगनचा मानवतेवर कब्जा होईल. तीन दिग्गज एकत्र येतील. काही लोकांकडे रेड करन्सी असेल. वांगा यांनी यात 100 आणि 5 च्या पुढे बरेच शून्य असल्याची भविष्यवाणी केली होती. विश्लेषकांच्या मते तो विशालकाय ड्रॅगन चीन आहे. तीन दिग्गजांचा अर्थ रशिया, भारत आणि चीन, असा आहे. तर 100 युआन आणि 5000 रूबलच्या नोटा लाल रंगाच्या असतात.

कॅन्सरवर उपचार - 21व्या शतकात सुरुवातीस मानवाला कॅन्सरपासून मुक्ती मिळेल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कॅन्सरसारखा भयंकर आजार लोखंडी साखळीने बांधला जाईल, असा दिवसही येईल.

Read in English