खळबळजनक! ऑनलाईन क्लासदरम्यान नराधम शिक्षकाने ७ वर्षाच्या मुलीचे केले लैंगिक शोषण, अशी झाली पोलखोल 

By पूनम अपराज | Published: October 21, 2020 09:11 PM2020-10-21T21:11:59+5:302020-10-21T21:28:08+5:30

अमेरिकेच्या शिकागो येथे एका ऑनलाइन वर्गात सात वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 18 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी वेस्ट चेस्टरफिल्डमध्ये एका ऑनलाइन वर्गात ब्रेकदरम्यान ही धक्कादायक घटना घडली.

गुरुवारी वेस्ट चेस्टरफिल्डमध्ये एका ऑनलाइन वर्गात ब्रेकदरम्यान ही धक्कादायक घटना घडली.  शिक्षकांनी विद्यार्थिनीला स्वत:चा कम्प्युटर म्यूट आणि कॅमेरा बंद करण्यास सांगितला. त्याचवेळी त्या मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. मात्र, इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्याला हे दुष्कृत्य करत पकडले आणि पोलिसांना कळविले.

संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांनी पीडितेच्या घरी छापा टाकला असता, मुलगी रडत ओरडत होती की, "मला काय माहित नाही, मला क्षमा कर"

आरोपीची ओळख १८ वर्षांचा कैटरेल ए वाल्स अशी असून, ज्याच्यावर 13 वर्षांखालील पीडित मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. कुक काउंटी असिस्टेंट स्टेट के अटॉर्नी एंड्रीना टुरानो म्हणाली की, गेल्या वर्षभरापासून कैटरेल ए वाल्स एका छोट्या मुलीचा लैंगिक शोषण करीत होता.