आईच्या विवाहबाह्य संबंधात अडसर ठरला मुलगा म्हणून प्रियकराला सांगून काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 10:55 PM2020-06-02T22:55:26+5:302020-06-02T23:00:50+5:30

नवरा दिल्लीत काम करत होता आणि पत्नी पाच वर्षांच्या मुलासह घरी एकटीच राहत होती. त्याचा दुसरा मुलगा वसतिगृहात शिकत असे. यादरम्यान, पत्नीचे एका व्यक्तीशी प्रेम झाले. लॉकडाऊनमध्ये जेव्हा मुलगा हॉस्टेलमधून आला आणि घरात राहू लागला, तेव्हा त्याच्यासमोर आईचे गुपित उघड झाले.

कलीयुगातल्या आईने हे आपलं पितळ उघड होण्याच्या भीतीने तिच्या प्रियकराने मुलाला ठार मारले. ही सनसनाटी घटना बिहारमधील गोपालगंजची आहे. (फोटो - आजतक)

गोपालगंज पोलिसांनी रविवारी या घटनेचा खुलासा केला ज्यामध्ये आपल्या विवाहबाह्य संबंधासाठी आईने आपल्या प्रियकराला सांगून अडसर बनलेल्या मुलाचा काटा काढला. गोपालगंजच्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ६० किमी अंतरावर काटेया पोलिस ठाण्यातील देउरियां गावात घडलेल्या या घटनेमुळे रक्ताच्या नात्याला लाज आणली आहे. (फोटो - आजतक)

10 मे रोजी पोलिस 12 वर्षीय अल्पवयीन मनीष कुमार यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले असता मृता मनीषची आई धर्मशीला देवी  मुलाच्या मारेकऱ्यास पकडून न्याय मिळवून देण्यासाठी विनवणी करीत होती. (फोटो - आजतक)

या आईच्या डोळ्यात अश्रू वाहताना पाहून, कोणाच्याही अश्रू येतील कारण ती एक आईच आहे. जिने आपला 12 वर्षाचा मुलगा गमावला आहे. त्यावेळी मृताच्या आईने पोलिसांसमोर अशी भीती व्यक्त केली होती की तिच्या मुलाला स्थानिक गुंडांनी द्वेषाने मारले आहे. तो बर्‍याचदा त्यांच्याशी भांडत असे.  (फोटो - आजतक)

या आईने आपल्या निर्दोष मुलाच्या मुलाची हत्या केली होती कारण तिचे भोरे पोलीस ठाण्यातील टिळक डुमर खेड्यातील चंदेश कुमारवर प्रेम होते. असे सांगितले जात आहे की, मृत मनीषला दोन भाऊ होते. वडील दिल्लीत नोकरी करतात. मनीष खासगी वसतिगृहात शिकायला होता.  पण लॉकडाऊन दरम्यान तो घरी आला. मनीषची आई तिच्या 5 वर्षाच्या मुलासमवेत एकटीच राहत होती. दरम्यान, तिचा प्रियकर चंदेश कुमार तिच्याशी संपर्क साधला होता आणि रात्री दोघेही भेटत असत. एक दिवस तिचा मुलगा मनीष, याला दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसला.

यानंतर मनीषच्या आईला भीती वाटू लागली की,आमचे बिंग फुटले जाईल, तिने तिचा प्रियकर चंदेश कुमारला सांगून मनीषाचा खून केला. या महिलेच्या प्रियकरानेही कबूल केले की, त्याचे या महिलेबरोबर तीन महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. गोपालगंजचे एसपी मनोजकुमार तिवारी यांनी सांगितले की, पोलिस हत्येप्रकरणी तपास करत आहेत. आईने निर्घृणपणे  मुलाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. ही हत्या तिने प्रियकरासह मिळून केली गेली. दोघांमध्ये काही परस्पर संबंध होते. हत्येत सामील झालेल्या दोघांना अटक केली आहे.