आरोग्य आणि सौंदर्य दोघांसाठीही फायदेशीर ठरते 'अरोमा थेरपी'!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:47 PM2019-02-05T12:47:01+5:302019-02-05T12:55:17+5:30

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. त्यामध्ये बाजारातील उत्पादनांपासून अनेक थेरपींचाही समावेश करण्यात येतो. अनेकदा उत्पादनांपेक्षा झटपट रिझल्ट देणाऱ्या थेरपींचा पर्याय निवडला जातो. तुम्हीही अशा एखाद्या थेरपीच्या शोधात असाल, ज्यामुळे तुमच्या सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही फायदा होईल तर, तुम्ही अरोमा थेरपी घेऊ शकता. तुळस, गुलाब आणि जॅस्मिन यांसारख्या इतर ऑइल्सच्या मदतीन ही थेरपी करण्यात येते. या थेरपीमध्ये मेंटल आणि फिजिकल दोन्ही फायदे होतात.

अरोमा थेरपीमध्ये आजारांवर उपचार वेगवेगळ्या सुगंधी तेलांच्या मदतीने करण्यात येतो. अरोमा थेरपी करताना गुलाब पाणी, तेल, अत्तर, अगरबत्तीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे याचा शरीरासोबतच आपल्या मनावरही परिणाम होतो. चांगल्या सुंगंधामुळे हृदय आणि मेंदू फ्रेश होण्यास मदत होते. यामध्ये वापरण्यात येणारं तेल आजारी माणसांचं मन प्रसन्न करण्याचं काम करतं. ही थेरपी फार सोपी आहे आणि तुम्ही स्वतःही काही गोष्टी लक्षात घेऊन याचा वापर करू शकता. जाणून घेऊया अरोमा थेरपीबाबत...

अरोमा थेरपीमध्ये प्रेशर पॉइंट्सला मसाज करण्यात येतो. ज्यामुळे हे पॉइंट्स रिलॅक्स होतात. पायांचे तळवे आणि हातांच्या तळव्यावरील प्रेशर पॉइंट्सवर प्रेशर दिल्याने पूर्ण शरीराला आराम मिळतो. यामुळे त्वचा कोरडी असेल तर ही समस्या दूर होते, तसेच केसांमध्ये कोड्यांची समस्या असेल तर ती सुद्धा दूर होते.

अरोमा थेरपीमुळे तुमची स्किन ग्लो करते. या थेरपीनंतर स्किन मुलायम होण्यास मदत होते. स्किन केअरसाठी या थेरपीमध्ये मॉयश्चरायझिंग लोशन, क्लिंजिग क्रिम आणि दूध यांचा वापर करण्यात येतो. चेहऱ्याच्या त्वचेवरील कमी होणारे नॅचरल ऑइल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ,जरॅनियम, रोज कॅमोमील, बेनजोइन, जॅस्मिन ऑइल एकत्र करून लावण्यात येतं.

जर तुम्हाला स्ट्रेस कमी करायचा असेल तर लव्हेंडर आणि रोजमेरीच्या तेलाचा वापर करा. थेरपीमध्ये वापरण्यात येणारं तेल आजारांपासून लढण्याची क्षमता म्हणजे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही मदत करतं.

अरोमा थेरपीचं वैशिष्ट्य म्हणजे, थेरपी सुरू करण्याआधी तुमच्या स्किनचा प्रकार ओळखून तेलाचा वापर करण्यात येतो. सेन्सिटिव्ह स्किनसाठी कॅमोमील, रोज, नेरोली यांचा वापर करण्यात येतो. नॉर्मल स्किनसाठी चंदन, लव्हेंडर, नेरोली किंवा रोज आइल यांचा वापर करण्यात येतो.