विदर्भात कोरोना बाधितांची संख्या आता १० झाली आहे. गोंदिया मेडिकलमध्ये संशयित म्हणून भरती असलेल्या २३ वर्षीय युवकाचे नमुने शुक्रवारी पहाटे पॉझिटिव्ह आले.या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळून आली आहेत. ...
वादळ आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या उभ्या पिकाची नासधूस झाली आहे. झाडांवरून संत्री गळून पडली आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या संत्र्यांची तोड लवकर न झाल्यास, ते गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
२७ मार्च ला ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा केला जातो. त्याअनुषंगाने या दिवशी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात असतात. मात्र, यंदा अमेरिकेच्या ‘ब्रॉडवे स्ट्रीट’पासून ते नागपूर शेजारच्या ‘झाडीपट्टी रंगभूमी’पर्यंत सगळी रंगभूमी थांबली आहे. ...
‘कोरोना’संदर्भात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता मेयो इस्पितळ तसेच ‘मेडिकल’मध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी. यासंदर्भात तातडीने नियोजन करावे व यंत्रणा अद्ययावत ठेवावी, अशी सूचना राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...
केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० कोटींच्या विविध योजनांची घोषणा केली. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागपूर जिल्ह्यातील गरजूंना याचा लाभ होणार असल्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘ऑडियो ब्रिज’च्या माध्यमातून भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. ‘कोरोना’च्या लढ्यात सरकारी यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे व शहरातील गरजूंपर्यंत वेळेत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी यावेळी के ...
छिंदवाड्यातील पाच मजूर आठ दिवसांपूर्वी हुडकेश्वर परिसरात सेंट्रिंगच्या कामासाठी आले. परंतु शहरात कर्फ्यू लागल्यामुळे काम बंद झाले. जवळचे रेशन संपले. कालपासून हे मजूर उपाशी होते. जवळचे पैसेही संपले. अखेर पायीच हे मजूर उपाशीपोटी गावाकडे निघाले. ...