मेयो-मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था ठेवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:54 AM2020-03-27T00:54:36+5:302020-03-27T00:55:47+5:30

‘कोरोना’संदर्भात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता मेयो इस्पितळ तसेच ‘मेडिकल’मध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी. यासंदर्भात तातडीने नियोजन करावे व यंत्रणा अद्ययावत ठेवावी, अशी सूचना राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

Place additional arrangements in Mayo-Medical: Guardian Minister's instructions | मेयो-मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था ठेवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

मेयो-मेडिकलमध्ये अतिरिक्त व्यवस्था ठेवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

Next
ठळक मुद्देउपलब्ध व्यवस्थेची केली पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : ‘कोरोना’संदर्भात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता मेयो इस्पितळ तसेच ‘मेडिकल’मध्ये अतिरिक्त व्यवस्था करण्यात यावी. यासंदर्भात तातडीने नियोजन करावे व यंत्रणा अद्ययावत ठेवावी, अशी सूचना राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. गुरुवारी त्यांनी दोन्ही ठिकाणी पाहणी करत उपलब्ध व्यवस्थेचा आढावा घेतला.
राऊत यांनी ‘मेयो’तील ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’ला भेट दिली. अतिरिक्त खाटांची आवश्यकता भासल्यास पुरेशी व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच ‘व्हेंटिलेटर’ व इतर यांत्रिक सामुग्रीची माहितीदेखील त्यांनी जाणून घेतली. ‘कॉम्प्लेक्स’मधील प्राणवायू पुरवठ्याची व्यवस्था स्वतंत्र ठेवा, असे निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे वॉर्डातील स्वच्छता व सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत रुग्ण व नातेवाईकांना माहिती देण्यासदेखील त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार मोहन मते, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, अप्पर आयुक्त अभिजीत बांगर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातूरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
‘आयएमसीआर’ व ‘डब्लूएचओ’च्या निकषानुसार वॉर्ड तयार करा
पालकमंत्र्यांनी ‘मेडिकल’चीदेखील पाहणी केली. तेथे कोविड १९ हा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे ‘स्कॅनिंग’ करण्यात येत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दिली. मेडिकलमध्येही ५० खाटांचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. कोविड १९ उपचारासाठी तयार करण्यात येणारे वॉर्ड ‘आयएमसीआर’ व ‘डब्ल्यूएचओ’च्या निकषानुसार तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या वॉर्डसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असावे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Place additional arrangements in Mayo-Medical: Guardian Minister's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.