छिंदवाड्यातील मजुरांची झाली दोन दिवस उपासमार : पायीच निघाले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:29 AM2020-03-27T00:29:34+5:302020-03-27T00:33:05+5:30

छिंदवाड्यातील पाच मजूर आठ दिवसांपूर्वी हुडकेश्वर परिसरात सेंट्रिंगच्या कामासाठी आले. परंतु शहरात कर्फ्यू लागल्यामुळे काम बंद झाले. जवळचे रेशन संपले. कालपासून हे मजूर उपाशी होते. जवळचे पैसेही संपले. अखेर पायीच हे मजूर उपाशीपोटी गावाकडे निघाले.

Two days of hungry laborer in Chhindwada : Return to their village by foot | छिंदवाड्यातील मजुरांची झाली दोन दिवस उपासमार : पायीच निघाले गावाकडे

छिंदवाड्यातील मजुरांची झाली दोन दिवस उपासमार : पायीच निघाले गावाकडे

Next
ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थेने केली भोजनाची सोय

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : छिंदवाड्यातील पाच मजूर आठ दिवसांपूर्वी हुडकेश्वर परिसरात सेंट्रिंगच्या कामासाठी आले. परंतु शहरात कर्फ्यू लागल्यामुळे काम बंद झाले. जवळचे रेशन संपले. कालपासून हे मजूर उपाशी होते. जवळचे पैसेही संपले. अखेर पायीच हे मजूर उपाशीपोटी गावाकडे निघाले होते. शहरातील सुभाष मार्गावर कळमना परिसरातील युवकांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.
हुडकेश्वर परिसरात सोनपूर, ता. अंबडवाडा, जि. छिंदवाडा येथील जगपाल एहके, संतलाल इवनाते, रामभान इवनाते, रामकुमार इवनाते, दीनदयाल सरयाम हे मजूर १९ मार्चला सेंट्रिंगच्या कामासाठी आले होते. दोन दिवसात कंत्राटदाराने काम बंद केले. परंतु सोबत असलेले तांदूळ, गव्हाचे पीठ या साहित्याच्या आधारावर या मजुरांनी दोन दिवस काम सुरू होण्याची वाट बघितली. परंतु काम सुरू झालेच नाही. अशातच बुधवारी त्यांच्याकडील रेशनही संपले. त्यामुळे रात्रभर ते उपाशी होते. बस आणि रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे गावाकडे कसे जायचे, असा प्र्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. अखेर पायीच गावाकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या जवळील पैसेही संपले होते. परंतु नागपुरात उपाशीपोटी मरण्यापेक्षा गावाकडे पायी जाऊ, असे त्यांनी ठरविले अन् ते पायीच निघाले. यावेळी कळमना मार्केट परिसरातील अंकित साकोरे, अभिषेक बावनकुळे, मुकेश निखारे, बाल्या बागडे हे खिचडी, चहा ऑटोमध्ये घेऊन वितरण करीत होते. रस्त्याने हे मजूर जाताना दिसताच त्यांनी ऑटो थांबवून या मजुरांना खिचडी, पाणी दिले. शहरातील मंदिर, रस्त्यावरील भुकेल्या नागरिकांना बुधवारपासून भोजन वितरित करीत असल्याचे या युवकांनी सांगितले. रस्त्यावरच या युवकांनी दिलेले अन्न खाल्ल्यानंतर हे मजूर छिंदवाडाच्या दिशेने निघून गेले.

Web Title: Two days of hungry laborer in Chhindwada : Return to their village by foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.