US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 07:37 IST2026-04-22T07:36:57+5:302026-04-22T07:37:52+5:30
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या मुदतीत वाढ केल्याची घोषणा केली असून इराणच्या बंदरांवरील अमेरिकन लष्कराची नाकेबंदी या काळातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले.

US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्याच्या दृष्टीने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाला मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पश्चिम आशियातील युद्धाचे ढग तूर्तास सरले असून राजनैतिक चर्चेला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
युद्धविरामाचा निर्णय जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, इराणी सरकारमध्ये सध्या अंतर्गत मतभेद असले, तरी इराण आणि अमेरिका यांच्यात एक कायमस्वरूपी आणि ठोस करार व्हावा, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. इराणला आपल्या बाजूने एकसंध आणि सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशानेच युद्धविरामाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे स्पष्ट करण्यात आले.
BREAKING: U.S. President Donald Trump has extended the ceasefire with Iran. pic.twitter.com/VE4kfnQhvf
— ILRedAlert (@ILRedAlert) April 21, 2026
हॉर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी मात्र कायम
या काळात अमेरिकन लष्कर इराणवर कोणत्याही प्रकारचे लष्करी हल्ले करणार नाही. मात्र,हॉर्मुझ सामुद्रधुनीतील अमेरिकन नौदलाची नाकेबंदी कायम राहील. या नाकेबंदीमुळे इराणचे मोठे नुकसान होत असून, त्यांना कराराच्या टेबलावर येण्यासाठी हा दबाव आवश्यक आहे," असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये समाधानकारक तोडगा निघत नाही, तोपर्यंत अमेरिकन लष्कर या भागात पूर्णपणे सज्ज राहील, असे आदेशही देण्यात आले आहेत.
On my personal behalf and on behalf of Field Marshal Syed Asim Munir, I sincerely thank President Trump for graciously accepting our request to extend the ceasefire to allow ongoing diplomatic efforts to take their course.
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) April 21, 2026
With the trust and confidence reposed in, Pakistan…
पाकिस्तानची मध्यस्थी
ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या विशेष विनंतीनंतर घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे. या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधान शरीफ यांनी सोशल मीडियाद्वारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. शरीफ म्हणाले की, "ट्रम्प यांनी दर्शविलेल्या विश्वासामुळे शांतता प्रक्रियेला बळ मिळाले आहे. मध्य पूर्वेतील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान आपले प्रयत्न सुरूच ठेवेल."