Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:12 IST2026-04-22T08:12:19+5:302026-04-22T08:12:54+5:30

Maharashtra Unseasonal Rain: मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २२ ते २४ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे.

Unseasonal Rain: Thunderstorms, hail and rain likely in the state till Friday, advisory for citizens | Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना

Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी सकाळी ठिकठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. तर महामुंबईमध्ये पेण, बदलापूर आणि कर्जत या ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला असून हवामानातील हे बदल पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहेत. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २२ ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. हवामानातील हे बदल दिलासा देणारे असले तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

नागरिकांसाठी सूचना  

- विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसताच तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
- झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.
- मोकळ्या जागेत मोबाइल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये.
- यात्रा, धार्मिक कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन स्थगित करावे.

राज्यात कुठे कुठे अवकाळी?

हिंगोली: जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसात वाळवणीसाठी ठेवलेली हळद भिजली. शेतातील उभी ज्वारी आडवी झाली. 

सिंधुदुर्ग: कणकवली शहरासह परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. आठवडा बाजार असल्याने ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. 

ठाणे, रायगड: पेण, कर्जत, बदलापूरसह काही ठिकाणी सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. बदलापुरात गारांचा पाऊस झाला.

सोलापूर: सोलापुरात संध्याकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली.

Web Title : बेमौसम बारिश का अलर्ट: महाराष्ट्र में तूफान, ओलावृष्टि और बारिश की आशंका

Web Summary : महाराष्ट्र में शुक्रवार तक बेमौसम बारिश का अलर्ट जारी किया गया है, जिसमें तूफान और ओलावृष्टि की आशंका है। नागरिकों को सलाह दी जाती है कि वे बिजली चमकने पर आश्रय लें, खुले क्षेत्रों से बचें और बड़ी सभाओं को स्थगित कर दें। कुछ जिलों में पहले ही बारिश और फसल नुकसान हुआ है। बारिश के बावजूद कुछ क्षेत्रों में तापमान 40 डिग्री सेल्सियस के आसपास रहेगा।

Web Title : Unseasonal Rain Alert: Storms, Hail, and Rain Expected in Maharashtra

Web Summary : Maharashtra faces unseasonal rain with storms and hail expected until Friday. Citizens are advised to seek shelter during lightning, avoid open areas, and postpone large gatherings. Some districts already experienced rainfall and crop damage. Temperatures will remain around 40 degrees Celsius in some regions despite the rain.