तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले. ...
आपल्या पुरुष प्रधान देशात आजही मुलींना मुलांपेक्षा कमी दर्जा दिला जातो. मुलांना घराण्यातील वारस व वंशाचा दिवा समजून त्यांना मुलीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. माणूस मेल्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी मुलाच्या हस्ते देण्याची रुढी व परंपरा आहे. ...
इंगळे चौक ते हनुमान चौकापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असून नगर परिषद प्रशासन त्यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आता नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहेत. ...
जिथे विद्यार्थी काय गावातही अ, आ,ई ची जाण नव्हती तिथे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अक्षर साक्षर केले. तब्बल १३ वर्षे शासनाची खाल मानेने चाकरी केली पण आज त्यांच्या कुटूंबीयावर कठीन वेळ आली असताना शासन चक्क हातवर करीत आहे. ...
महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आणि टँकर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सुरूवात केली.या अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील दलदल कुही, टोयागोंदी ही गाव पाणीदार झाली.तर अनेक गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली. ...
तालुक्यातील आंबेतलाव येथे बुधवारी (दि.२४) नेवालाल पटले यांच्या घरात पोषण आहार पुरवठा योजनेचा अवैध १८० कट्टे (प्रती कट्टा ५० किलो) तांदळाचा साठा असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्यानंतर गोरेगाव पोलीस, तहसीलदार यांच्यासह आंबेतलाव येथ ...
जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. त्यामुळे कृषीसाठी सिंचन आणि त्यावर आधारित उद्योग स्थापना करुन बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल याच दृष्टीने आपले सदैव प्रयत्न राहिले आहे. क्षेत्राचा सर्वांगिन करणे हेच आपले मुख्य ध्येय अस ...
शिक्षणाचा गंध नसणाऱ्या गावात शिक्षणाचे रोपटे लावून त्याचे वटवृक्ष केले, एक दोन नव्हे तब्बल १७ वर्ष शासनाची चाकरी केली पण ऐन उमेदीच्या काळात काळाने जीवावर घाला घातला आणि अंशदायीच्या कचाट्यात सापडलेल्या त्या कर्मचाऱ्यांचे कुटूंब आजही सैरावैरा भटकत आहे. ...