ठाणे महापालिकेसह, परिवहन आणि शिक्षण विभागातील कामगारांना यंदा १५ हजार १०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले आहे. तर कंत्राटी कामागारांनासुध्दा एक पगार दिला जाणार आहे. ...
ठाणे परिवहन सेवेत आता आणखी एक घोटाळा समोर येऊ घातला आहे. परिवहनच्या १५० बसेसवर साडआठ कोटी दुरुस्तीसाठी खर्च करुन त्या बसेस जीसीसी तत्वावर खासगी ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यातून पुढील पाच वर्षात त्या ठेकेदाराला ४५७ कोटी मिळणार आहेत. ...
नेहमी प्रमाणे शनिवारी झालेल्या महासभेतसुध्दा गोंधळ करुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी केलेल्या हातमिळवणीत अनेक महत्वाचे विषय चर्चेविनाच मंजुर करुन घेतले. याविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ...
थीम पार्कबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परंतु त्या समितीची महिना उलटत आला तरीसुध्दा एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे दोषींवर पांघरुन घालण्याचे काम होत आहे का? अशी शंका मात्र या निमित्ताने उपस्थित झाली आहे. ...
ठाणे शहरातील होर्डींग्ज आणि त्यावर प्रसिध्द होणाऱ्या जाहीरातींचा विषय शनिवारच्या महासभेत गाजणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रशासनाला घेरण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मागील काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपा थीम पार्कच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. परंतु आता या कामात ठेकेदाराच जबाबदार असून पालिका प्रशासनातील अधिकारी निर्दोष असल्याचा एक प्रकारे निर्वाळाच सत्ताधारी शिवसेनेने दिला आहे. ...