सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, “भारत जोडो यात्रेचा संदेश देशभरात पोहोचला आहे. सत्ताधारी पक्ष भाजपला टीका आवडत नाही. टीका केलीत तर तुरुंगात जा. लाखो लोक आमच्या प्रवासात सामील होत आहेत.” ...
पायलट हे जयपूरमध्ये गेहलोत गटाच्या मंत्र्यांना भेटले आणि दिल्लीला रवाना झाले आहेत. याचबरोबर गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यानेही तसे संकेत दिले आहेत. ...