गेहलोतांची खुर्ची जाणार? सचिन पायलट मंत्र्यांना भेटून दिल्लीत; राजस्थानच्या मंत्र्याकडून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:43 PM2022-10-04T18:43:22+5:302022-10-04T18:44:39+5:30

पायलट हे जयपूरमध्ये गेहलोत गटाच्या मंत्र्यांना भेटले आणि दिल्लीला रवाना झाले आहेत. याचबरोबर गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यानेही तसे संकेत दिले आहेत.

Ashok Gehlot's CM Post will go? Sachin Pilot in Delhi after meeting with Geholts ministers; A signal from the Minister of Rajasthan | गेहलोतांची खुर्ची जाणार? सचिन पायलट मंत्र्यांना भेटून दिल्लीत; राजस्थानच्या मंत्र्याकडून संकेत

गेहलोतांची खुर्ची जाणार? सचिन पायलट मंत्र्यांना भेटून दिल्लीत; राजस्थानच्या मंत्र्याकडून संकेत

Next

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अचानक राजस्थान सरकारवर संकट आले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत दिल्लीत गेले तर राज्यात सचिन पायलट मुख्यमंत्री होतील या भीतीने गेहलोतांनी आपल्या ९० हून अधिक आमदारांना राजीनामे द्यायला लावले होते. आता ही खेळी गेहलोत यांच्यावरच उलटली असून काँग्रेसचे अध्यक्षपद तर गेलेच परंतू मुख्यमंत्री पद देखील जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पायलट हे जयपूरमध्ये गेहलोत गटाच्या मंत्र्यांना भेटले आणि दिल्लीला रवाना झाले आहेत. याचबरोबर गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यानेही तसे संकेत दिले आहेत. मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी पायलट गटाचे पाच जण मंत्री बनू शकतात तर पायलट मुख्यमंत्री का बनू शकत नाहीत, असे वक्तव्य केले आहे. काही लोकांनी पायलट यांच्यासोबत राहून त्यांच्याविरोधातच कटकारस्थाने रचली आहेत. त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना शिव्या दिल्या जात आहेत. एवढा धोका मिळाला तरी ते त्यांच्या लक्षात आलेले नाही, असेही या मंत्र्यांनी म्हटले आहे. 

राजेंद्रसिंह गुडा यांनी विधानसभेच्या मुख्य प्रतोदांवरही हल्ला चढवला. ज्यांच्याकडे आमदारकी रद्द करण्याचा अधिकार आहे, त्या लोकांनी पायलटचीही फसवणूक केल्याचे ते म्हणाले. 2018 च्या निवडणुकीत पायलट यांनी ज्यांना ज्यांना तिकीटे दिली, तेही पायलट यांच्या नावावर निवडणूक जिंकून आले, मात्र नंतर पायलट यांची फसवणूक केली, असाही आरोप त्यांनी केला. 

काही लोक पायलट यांना बंडखोर म्हणत आहेत, पण दिल्लीतील निरीक्षकांसमोर जे घडले, ते बंड नव्हते का? त्यांनी पायलट यांची तुलना अभिमन्यूशी करताना म्हटले की आणि त्यांना घेरले गेले पण त्यांनी आपला संयम गमावला नाही. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सचिन पायलट यांनी जयपूरमध्ये प्रताप सिंह खाचरियावास आणि राजेंद्र गुढा यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली. हे सर्व गेहलोत गटाचे नेते आहेत. पायलट आता दसऱ्यानंतरच परतणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: Ashok Gehlot's CM Post will go? Sachin Pilot in Delhi after meeting with Geholts ministers; A signal from the Minister of Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.