मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 06:33 PM2024-05-26T18:33:50+5:302024-05-26T18:34:32+5:30

मुंबई शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

Chance of rain in Mumbai Marathwada will also rain with lightning Latest weather forecast for 24 hours | मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज

Weather Forecast ( Marathi News ) : महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याचं चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग), हलका ते  माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग), हलका ते  माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकीकडे पाऊस कोसळत असताना अकोला येथे ४५.६° सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर दुसरीकडे, धाराशिव  येथे २२.०° सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान होते.

उष्णतेच्या लाटेचा इशारा

धुळे, जळगाव, अकोला, चंद्रपूर, परभणी, हिंगोली, नांदेड पुढील ४८ तासांत उष्णतेची लाट येणार असून, सायंकाळी पावसाची शक्यता आहे. यातील अकोला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमान असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Web Title: Chance of rain in Mumbai Marathwada will also rain with lightning Latest weather forecast for 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.